IND vs SL Asia Cup 2023 LIVE : आशिया चषकातील सुपर 4 सामन्यात पावसाने खोळंबा घातलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातला. रविवारी मुसळधार पाऊस आल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना थांबवावा लागला. हा सामना राखीव दिवशी घेण्याचा निर्णय घेण्यात आला, पण राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी कोलंबोमध्ये सकाळपासूनच पावसाने लंपडाव सुरु केला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला उशीर होत आहे. त्यातच आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यावेळीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी, कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे. पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारी कोलंबोत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे अधीच भारत आणि पाकिस्तान सामन्यात व्यत्यय आलाय. मुसळधार पावसामुळे आशिया चषकातील टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. 


सुपर 4 मध्ये प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. पण भारताच्या प्रत्येक सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आधीच पावसामुळे प्रभावित झालाय. आज सामना झाला नाहीतर भारत आणि पाकिस्तान संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. श्रीलंकाविरोधात सामन्यातही पावसाने हजेरी लावली अन् सामना झाला नाही तर एक एक गुण मिळेल. पाकिस्तान आणि श्रीलंका संघाने प्रत्येकी एक एक विजय मिळवालय. भारताविरोधातील यांचे सामने पावसामुळे रद्द झाले तरी त्यांना प्रत्येकी एक एक गुण मिळतील. अशा स्थितीत त्यांची गुण भारतापेक्षा जास्त होतील. अशा स्थितीत भारताला बांगलादेशविरोधात विजय अनिवार्य होतो. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये खेळणार, हे निश्चित झालेय. पावसामुळे भारतीय संघाचे आशिया चषकातील आव्हान संपू शकते. 


भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामनाही कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर होणार आहे. मंगळवारी दुपारी सामन्याला सुरुवात होईल. मंगळवारी कोलंबोत दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोलंबोमध्ये मंगळवारी 60 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसाची सुरुवातच पावसाने होईल. दुपारनंतर पावसाची शक्यता आणखी जास्त आहे. संध्याकाळी ढगाळ वातावरण असल्याचे वर्तवण्यात आलेय.  मंगळवारी सकाळी 10 वाजता कोलंबोत 94 टक्के पावसाची शक्यता आहे. तर दुपारी एक वाजता 85 टक्के पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे. संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत 72 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.