Axar Patel: भारत-श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आलाय. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची संघात ऐन्ट्री झालीय. तर, फिरकीपटू कुलदीप यादव संघाबाहेर झालाय. महत्वाचं म्हणजे, पहिल्या कसोटी सामन्यातही कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नव्हती.


भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतीलदुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 12 मार्चपासून खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर डे- नाईट खेळवला जाणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अक्षर पटेलचं संघात पुनारागमन झालंय. दुखापतीमुंळं अक्षर पटेल संघाबाहेर झाला होता. त्याच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र, अक्षरच्या पुनरागमनामुळं कुलदीप यादव संघाबाहेर झालाय. 


भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह , मोहम्मद सिराज, शुभमन गिल, उमेश यादव, प्रदीप यादव, के. पांचाळ, श्रीकर भरत, सौरभ कुमार, अक्षर पटेल.


श्रीलंकेचा संघ-
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, चरिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, विश्वा फर्नांडो, लसिथ एम्बुल्डेनिया, लाहिरू कुमाराबेंच, प्रवीण जयनेरुना चन्द्रमाने, करिथुना चन्द्रमाने, करिथुना चन्द्रमाने, कर्णिराम बेंच,जेफ्री करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha