IND vs SA, ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Afriaca) यांच्यात पहिला एकदिवसीय सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळला गेला. या सामन्यात भारताला 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 नं पिछाडीवर गेलाय. यावेळी भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) अर्धशतक झळकावून खास क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर  पोहचलाय.

यावर्षी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत पाकिस्तानचा कर्धणार बाबर आझम टॉपवर आहे. त्याच्या नावावर एकूण 17 अर्धशतकांची नोंद आहे. तर, बांग्लादेशचा फलंदाज लिटन दास 13 अर्धशतकासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, मोहम्मद रिझवान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं यावर्षी आतापर्यंत 10 अर्धशतक झळकावले आहेत. या यादीत श्रेयस अय्यरचा समावेश झालाय. रिझवानसह श्रेयस अय्यर सयुंक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोघांनीही यावर्षी प्रत्येकी 10-10 अर्धशतक झळकावली आहेत. 

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक (2022)

बाबर आजम 17
बाबर आजम 13
मोहम्मद रिझवान 10
श्रेयस अय्यर 10

भारताचा 9 धावांनी पराभव
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवारी पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळं हा सामना 40-40 षटकांचा खेळवण्यात आला. ज्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं चार विकेट्स गमावून भारतासमोर 250 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघ 40 षटकांत 240 धावाच करु शकला आणि दक्षिण आफ्रिकेनं हा सामना 9 धावांनी जिंकला. भारतासाठी संजू सॅमसननं एकाकी झुंज दिली. परंतु, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. त्यानं 63 चेंडूत नाबाद 86 धावांची खेळी केली. ज्यात 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. 

हे देखील वाचा-