IND vs SA Test कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी तिसऱ्याच दिवशी संपली. भारताचा या कसोटीत 30 धावांनी पराभव झाला. भारताचा संघ 124 धावांचं आव्हान गाठू शकला नाही. या मॅचनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरनं कॅप्टन शुभमन गिलच्या दुखापतीवर भाष्य केलं आहे. या कसोटीत भारताला शुभमन गिलची अनुपस्थिती जाणवली. 

Continues below advertisement


Gautam Gambhir on Shubman Gill : गौतम गंभीर काय म्हणाला? 


शुभमन गिल पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला होता.त्यानंतर तो मैदानावर येऊ शकला नाही. गिलच्या मानेमध्ये वेदना होत असल्यानं त्याला रुग्णालयात जावं लागलं. याचा फटका भारतीय संघाला बसला. भारताला 124 धावांचं आव्हान पार करता आलं नाही. भारताचा 30 धावांनी पराभव झाला आहे. मॅचनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरनं पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यामध्ये त्यानं  गिलच्या दुखापतीबाबत माहिती दिली.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. दुसरी कसोटी गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. गौतम गंभीरनं म्हटलं की दुसऱ्या कसोटीसाठी शुभमन गिल उपलब्ध असेल की नाही याबाबत स्थिती स्पष्ट नाही. त्याचा फिटनेस पाहून आम्ही यावर अंतिम निर्णय घेऊ. 


गौतम गंभीर म्हणाला की शुभमन गिल सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. शुभमन गिलच्या फिटनेसचा अभ्यास करत आहोत. काय होतंय पाहुया असं गौतम गंभीर म्हणाला.  फिजिओ आज रात्री शुभमन गिलच्या दुखापतीबाबत निर्णय घेतील, त्याच्या आधारावर आमचं  पुढचं पाऊल असेल, असं गंभीर म्हणाला. 


ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचा बचाव 


गौतम गंभीरनं ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचा बचाव केला.भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत ज्या प्रकारचं पिच पाहायला मिळालं त्याच्यावर टीका होत आहे. मात्र, प्रशिक्षक गंभीर यानं खेळपट्टीचा बचाव केला, इथं फलंदाजांच्या संयमाची चाचणी होती. फलंदाजांना इथं सावधपणे खेळण्याची गरज होती. वेळ घेत फलंदाजी करायला हवी होती, आक्रमक फलंदाजी करण्याची गरज नव्हती, असं गंभीर म्हणाला. गंभीरनं वॉशिंग्टन सुंदर आणि टेम्बा बावुमाचं उदाहरण दिलं.  


आम्ही जशी खेळपट्टी मागितली होती, त्याच प्रकारची ही खेळपट्टी होती. यामध्ये काही कमी नव्हतं, पूर्णपणे खेळ्यासाठी योग्य खेळपट्टी होती. तुम्ही जर याला फिरकी खेळपट्टी म्हणाल मात्र वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट घेतल्यात, असं गंभीर म्हणाला.