IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतानं पुढील दोन सामन्यात विजय मिळून जोरदार कमबॅक केलंय. या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्डेडियमवर सुरु आहे. निर्णायक सामन्यात ऋषभ पंत याने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली. ऋषभ पंतने सलग पाचव्यांदा नाणेफेक गमावली. पंतच्या नाणेफेकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 


टेम्बा बावुमासमोर पहिल्या चार सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक गमावली होती. आज निर्णायक सामन्यातही पंतला नाणेफेक जिंकता आली नाही. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकली. यासह या मालिकेत पंतला एकदाही नाणेफेक जिंकता आली नाही. सलग पाच वेळा पंतने नाणेफेक गमावली. यासह त्याने विराट कोहलीचा नकोसा विक्रम मोडीत काढलाय. विराट कोहलीने टी 20 मध्ये सलग चार वेळा नाणेफेक गमावली होती.  


दरम्यान, निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफिक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमीत कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त असल्यामुळे केशव महाराज दक्षिण आफ्रिकेकडून नाणेफेकीसाठी मैदानात उतरला. नाणेफेक जिंकून त्याने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकानं संघात तीन बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकाकडून टेम्बा बावुमा, तरबेज शम्सी आणि मार्को जेनसन यांना आराम देण्यात आलाय. त्यांच्याजागी ट्रस्टन स्टब्स, रीजा हेंड्रिक्स आणि कगिसो रबाडाला संघात स्थान दिलेय. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. विजयी संघ कायम ठेवण्यात आलाय. 






भारताची प्लेईंग 11 - 
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल


दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 - 
क्विंटन डिकॉक (विकेटकिपर),  रिजा हेंड्रिक्स, डेवान प्रिटोरियस, रासी वान डुसेन, एच. कालसेन, डेविड मिलर, ट्रस्टिन स्टब्स, कगिसो रबाडा, केशव महाराज (कर्णधार), एनरिक नॉर्त्जे, लुंगी एनगिडी