IND vs SA Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी खराब असल्यामुळे सामना उशीराने सुरु झाला. सेंचुरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर सामना सुरु होण्याआधी खेळपट्टी सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करण्यात आलाय. खेळपट्टी तयार झाल्यानंतर राहुल द्रविडने गोलंदाजीही केली. 


 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला. पहिल्या सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये आमनेसामने आहेत. येथे सोमवारी रात्री येथे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काहीप्रमाणात खेळपट्टी ओली झाली होती. त्यामुळे नाणेफेकीला उशीर तर झालाच, शिवाय खेळपट्टी लवकरात लवकर कोरडी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मेहनत घ्यावी लागली. 










मैदानाच्या कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी कोरडी करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला. खेळपट्टीवर काही ठिकाणी ओलावा होता, तो हेयर ड्रायरच्या मदतीने कोरडं केले. त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. खेळपट्टी कोरडी झाल्यानंतर राहुल द्रविडने गोलंदाजीही केली. 










विराट कोहलीही त्यावेळी मैदानात बॅट घेऊन सराव कराताना दिसला. त्याच्यासोबत कर्णधार रोहित शर्माही दिसला. महिनाभरानंतर विराट आणि रोहित शर्मा मैदानात परतलेत. 


खेळ सुरू होण्यास उशीर होणार होता, त्यावेळी भारतीय खेळाडू मैदानावर हसत हसत-मस्करी करताना दिसले. नाणेफेकीपूर्वी जसप्रीत बुमराहने प्रसिध्द कृष्णाला कसोटी पदार्पणाची कॅपही दिली.


 






भारतीय संघात कोण कोण ?


रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल सलामीची भूमिका पार पाडतील. तर शुभमन गिल आणि विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतील. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्याकडे मधल्या फळीची जबाबदारी असेल. जसप्रीत बुमराह आणि सिराज यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल, त्यांच्या जोडीला प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर असतील.


पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया -


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर,  केएल राहुल (विकेटकिपर),रवि अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. 


दक्षिण आफ्रिकेचा संघ - 


टेंबा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोर्जी, डीन एल्गर, एडन मार्करम, कीगन पीटरसन, मार्को यानसेन, डेविड बेडिंघम, काइल वॅरेनी, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्जी, आणि कगिसो रबाडा