= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 : अहमदाबादचा रणसंग्राम जिंकला! दक्षिण आफ्रिकेवर भारताचा 30 धावांनी दणदणीत विजय भारताने पाचवा टी-20 सामना 30 धावांनी जिंकला.
यासह टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 3-1 असा पराभव केला आणि सलग सातवी टी-20 मालिका जिंकली.
शुक्रवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने 20 षटकांत पाच गडी बाद 231 धावा केल्या.
प्रत्युत्तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत आठ गडी बाद 201 धावाच करू शकला आणि सामना गमावला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माची वादळी खेळी; दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचे लक्ष्य हार्दिक आणि तिलकच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 Live Score : हार्दिक पांड्या नावाचं वादळ, फक्त 16 चेंडूत ठोकले अर्धशतक... पाहा लाईव्ह अपडेट्स हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात धमाकेदार कामगिरी केली आणि त्याने केवळ 16 चेंडूत कारकिर्दीतील सहावे अर्धशतक पूर्ण केले.
टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजाने केलेले हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे.
हार्दिक आणि तिलक यांनी 80 धावांची नाबाद भागीदारी केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 Live Score : भारताचा दुसरा धक्का! संजू सॅमसनला OUT भारताला दुसरा धक्का जॉर्ज लिंडेने दिला, ज्याने संजू सॅमसनला बाद केले.
त्याने 22 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारत 37 धावा केल्या.
त्याने तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी 30 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 Live Score : भारताला 63 धावांवर पहिला धक्का भारताला पहिला धक्का कॉर्बिन बॉशने दिला, ज्याने अभिषेक शर्माला बाद केले.
तो 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
अभिषेक आणि सॅमसनने पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 Live Score : दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग इलेव्हन क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 Live Score : भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 Live Score : कर्णधार सूर्याचा मोठा निर्णय; टीम इंडियात 3 मोठे बदल या सामन्यासाठी भारताने त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये तीन बदल केले आहेत.
हर्षित राणाची जागा जसप्रीत बुमराहने घेतली आहे.
कुलदीप यादवची जागा वॉशिंग्टन सुंदरने घेतली आहे.
शुभमन गिलची जागा संजू सॅमसनने घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेने एक बदल केला आहे, ज्यामध्ये जॉर्ज लिंडेने अँरिच नॉर्टजेची जागा घेतली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 Live Score : दक्षिण आफ्रिकेने जिंकली नाणेफेक अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या पाचव्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 Live Score : दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग 11 रीजा हेंड्रिक्स, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), एडन मारक्रम (कप्तान), डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, डोनोवान फेरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटेनिल बार्टमॅन.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 Live Score : भारताची संभाव्य प्लेईंग 11 अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर/ जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 Live Score : शुभमन गिलच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह भारतीय संघाबाबत बोलायचे झाल्यास पाचव्या टी20 साठी शुभमन गिल उपलब्ध असणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
लखनऊ सामन्यापूर्वी सरावादरम्यान त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.
त्यामुळे त्याच्या खेळण्यावर सस्पेन्स कायम आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 5th T20 Live Score : बुमराहच्या पुनरागमनाची शक्यता दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या संघात पुनरागमनाची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, आगामी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारतीय परिस्थितीत आपले प्रयोग तपासण्याची दक्षिण आफ्रिकेसाठी ही शेवटची संधी असेल.