IND vs SA 4th T20 Live : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात चौथा राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (saurashtra cricket association stadium) खेळवला जात आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत नुकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. आजच्या मैदानाची खेळपट्टी फलंदाजासाठी चांगली असली तरी आतापर्यंत बहुतांश सामन्यात मोठी धावसंख्याही चेस करता आल्याने आजच्या सामन्यातही द.आफ्रिकेने हाच विचार करुन प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता भारतीय संघाने एकही बदल केलेला नाही. भारतीय संघाने तिसरी टी20 जिंकल्याने तोच संघ घेऊन टीम इंडिया मैदानात उतरत आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघात मात्र काही बदल झाले आहेत. रबाडा आणि पारनेल हे दुखापतीमुळे बाहेर असून मार्को आणि इंगिडी संघात आले आहेत. क्विंटन डी कॉकही परतल्याने रीझा हेंड्रिक्स बाहेर गेला आहे. तर नेमकी अंतिम 11 कशी आहे पाहुया...
दोन्ही संघाची अंतिम 11
भारत - ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका - टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, तबरेझ शम्सी, मार्को यान्सेन, लुंगी इंगिडी, एनरिक नॉर्खिया.
हे देखील वाचा-
- IND vs SA, 3rd T20: तिसऱ्या टी-20 मध्ये विश्वविक्रमासाठी मैदानात उतरणार भुवनेश्वर कुमार, एक विकेट घेऊन रचणार इतिहास
- Asian Cup 2023: सलग दुसऱ्यांदा भारतीय फुटबॉल संघ एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र
- IND vs SA 3rd T20: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज काटे की टक्कर, पाच खेळाडूंच्या प्रदर्शनावर सर्वांचं लक्ष!