South Africa tour of India 2022 : भारत आणि दक्षिण अफ्रिका (india vs south africa) यांच्यातील पाच सामन्याच्या मालिकेतील चौथा सामना आज होणार आहे. राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर  (saurashtra cricket association stadium) भारतीय संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने उतरेल. पाच सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना करो या मरो असा आहे. तर हा सामना जिंकून मालिका विजयाच्या इराद्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरेल. 


राजकोटमध्ये भारतीय संघाची कामगिरी -
राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर  टी 20 सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे. होय... या मैदानावर भारतीय संघ आतापर्यंत तीन टी 20 सामने खेळला आहे. यामध्ये टीम इंडियाने दोन सामन्यात बाजी मारली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.  


नाणेफेक महत्वाची - 
राजकोटच्या मैदानात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. कारण, प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत विजय नोंदवलाय. अशात ऋषभ पंतला नाणेफेकीचा कौल जिंकावा लागेल. दक्षिण आफ्रिकाविरोधात झालेल्या पहिल्या तिन्हीही सामन्यात ऋषभ पंतला एकदाही नाणेफेक जिंकता आली नाही. 


पावसाची शक्यता -
फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाव्यतिरिक्त राजकोटचे हवामान भारतासमोर मोठं आव्हान उभं करू शकताच. राजकोटमध्ये नुकताच पाऊस झाला असून शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात पावसामुळं व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवामान वेबसाईटनुसार, राजकोटमध्ये शुक्रवारी ढगाळ वातावरण असेल आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजकोट येथे  15 ते 25 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे.


भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 18 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 10 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.


भारताचा संभाव्य संघ-
इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.


दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ-
क्विंटन डी कॉक/रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसीव्हेन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिके नॉर्खिया, तबरेज शम्सी.