Ind vs SA 2nd T20: भारत आणि दक्षिण अफ्रिकेत सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका (India vs South Africa T20 Series) खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 101 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आज दुसरा टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. चंदीगडच्या मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळवला जाईल. (Ind vs SA 2nd T20)
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि उपकर्णधार शुभमन गिल (Shubhman Gill) यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. पहिल्या सामन्यात दोघेही लवकर बाद झाले, त्यामुळे दोघांकडूनही दुसऱ्या टी-20 सामन्यात मोठी खेळी अपेक्षित आहे. गोलंदाजीत, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या भारताच्या फिरकी जोडीने दक्षिण आफ्रिकेला दबावाखाली ठेवले. जसप्रीत बुमराहची लय आणि अर्शदीप सिंगचा स्विंग हे देखील संघाचे प्रमुख बलस्थान आहेत. दरम्यान, तिलक वर्माच्या जागी आज संजू सॅमसनला संधी मिळू शकते. (Ind vs SA 2nd T20)
दक्षिण अफ्रिकेच्या संघाला गोलंदाजीपेक्षा फलंदाजांची जास्त चिंता- (Ind vs SA 2nd T20)
पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पूर्णपणे ढासळली. दक्षिण अफ्रिकेच्या संघाला गोलंदाजीपेक्षा फलंदाजांची जास्त चिंता आहे. अॅडम मारक्रम, डेव्हीड मिलर आणि ब्रेव्हिससारखे खेळाडू यावेळी जबाबदारीने खेळण्याचा प्रयत्न करतील. दक्षिण अफ्रिकेच्या संघाकडून कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत, परंतु फलंदाजीच्या क्रमात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसऱ्या टी-20 साठी भारताची संभाव्य Playing XI: (Ind vs SA 2nd T20 Team India Playing XI)
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा/संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
दुसऱ्या टी-20 साठी दक्षिण आफ्रिकेची संभाव्य Playing XI: (Ind vs SA 2nd T20 South Africa Playing XI)
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), अॅडम मारक्रम (कर्णधार), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रुविस, डोनोवन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जानसेन, कॉर्बिन बॉश, अँरिच नॉर्टजे, क्वेना म्फाका
टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ- (Ind vs SA T20 Team India Squad)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा.