= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दक्षिण आफ्रिकेचा पलटवार, सूर्याच्या संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात गुडघे टेकले, भारताचा 51 धावांनी पराभव! क्विंटन डी कॉकच्या शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर ओटेनलीट बार्टमनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव केला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
डी कॉकच्या शानदार अर्धशतकाच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 बाद 213 धावा केल्या.
प्रत्युत्तर, भारत 19.1 षटकांत 162 धावांवर ऑलआउट झाला.
अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : टीम इंडियात संकटात, 3 षटकात 3 मोठे धक्का! गौतम गंभीरचा चेहरा पडला, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा कहर धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.
शुभमन गिल आपले खाते उघडू शकला नाही आणि लुंगी एनगिडीने त्याला बाद केले.
मार्को जानसेनने सहकारी सलामीवीर अभिषेक शर्मा (17 धावा) ला बाद केले.
त्यानंतर जानसेनने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (5 धावा) ला बाद केले.
सूर्याच्या बाद होताना भारताची धावसंख्या 32/3 होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : दक्षिण आफ्रिकेने थंडीत टीम इंडियाला फोडला घाम; बुमराह अन् अर्शदीपला फलंदाजांनी धू-धू धुतले, ठेवले 214 धावांचे लक्ष्य न्यू चंदीगड मुल्लांपुर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना सध्या खेळला जात आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली, पण हा निर्णय पूर्णपणे उलट ठरला.
कडाक्याच्या थंडीतही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला.
क्विंटन डी कॉकने तुफानी फटकेबाजी करत केवळ 90 धावा ठोकत भारतीय गोलंदाजीची धुलाई केली.
त्याच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 214 धावांचे भल्यामोठे लक्ष्य ठेवले आहे.
भारतीय गोलंदाजांमध्ये वरुण चक्रवर्ती (2 विकेट) आणि अक्षर पटेल (1 विकेट) यांनी विकेट घेतली.
याशिवाय इतर कोणताही प्रमुख गोलंदाज एकही विकेट घेऊ शकला नाही.
अर्शदीप सिंगला 4 षटकात 54 धावा ठोकल्या. त्याच्या षटकात आफ्रिकन फलंदाजांनी फटकेबाजीचे तुफानच घातले. बुमराहलादेखील आज लय सापडली नाही.
आता भारतापुढे 214 धावांचे आव्हान आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : वरुण चक्रवर्तीचा कहर! स्वत:च्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर केली मोठी शिकार दक्षिण आफ्रिकेने पाचव्या षटकात पहिली विकेट गमावली आणि एकूण धावसंख्या 38 झाली.
वरुण चक्रवर्तीने रीझा हेंड्रिक्सला बाद केले.
10 चेंडूत एका षटकारासह आठ धावा काढून तो बाद झाला.
या षटकात चक्रवर्तीने तीन धावा दिल्या.
दक्षिण आफ्रिकेची पाच षटकांनंतरची धावसंख्या 1 बाद 41आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग इलेव्हन रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये नाही कोणताही बदल या सामन्यासाठी भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने जिंकली नाणेफेक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : दुसऱ्या टी-20 साठी दक्षिण आफ्रिकेची संभाव्य Playing XI क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), अॅडम मारक्रम (कर्णधार), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रुविस, डोनोवन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जानसेन, कॉर्बिन बॉश, अँरिच नॉर्टजे, क्वेना म्फाका
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : दुसऱ्या टी-20 साठी भारताची संभाव्य Playing XI अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा/संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : दक्षिण अफ्रिकेच्या संघाला गोलंदाजीपेक्षा फलंदाजांची जास्त चिंता पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पूर्णपणे ढासळली.
दक्षिण अफ्रिकेच्या संघाला गोलंदाजीपेक्षा फलंदाजांची जास्त चिंता आहे.
अॅडम मारक्रम, डेव्हीड मिलर आणि ब्रेव्हिससारखे खेळाडू यावेळी जबाबदारीने खेळण्याचा प्रयत्न करतील.
दक्षिण अफ्रिकेच्या संघाकडून कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत, परंतु फलंदाजीच्या क्रमात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : भारतीय फिरकी जोडीने दक्षिण आफ्रिकेला ठेवले दबावाखाली गोलंदाजीत, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या भारताच्या फिरकी जोडीने दक्षिण आफ्रिकेला दबावाखाली ठेवले.
जसप्रीत बुमराहची लय आणि अर्शदीप सिंगचा स्विंग हे देखील संघाचे प्रमुख बलस्थान आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs SA 2nd T20 Live Score : पहिल्या सामन्यातील खराब कामगिरीनंतर गिल अन् सूर्यावर सर्वांची नजर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि उपकर्णधार शुभमन गिल (Shubhman Gill) यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. पहिल्या सामन्यात दोघेही लवकर बाद झाले, त्यामुळे दोघांकडूनही दुसऱ्या टी-20 सामन्यात मोठी खेळी अपेक्षित आहे.