- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
IND vs SA 2nd ODI LIVE Score : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय, वनडे मालिकेत बरोबरी
IND vs SA 2nd ODI LIVE Scorecard Update Marathi : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळला जात आहे.
पार्श्वभूमी
India vs South Africa 2nd ODI LIVE Scorecard Update : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांचा दुसरा वनडे सामना छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगला आहे....More
दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 4 विकेटनं विजय मिळवला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का बसला आहे. अर्शदीप सिंगनं यानसेनची विकेट घेत भारताला सहावं यश मिळवून दिलं.
प्रसिद्ध कृष्णा यानं ब्रीत्झके याला 68 धावांवर बाद करत भारताला पाचवी विकेट मिळवून दिली.
भारताविरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 282 धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेव्हिस आणि मॅथ्यू ब्रिट्झके क्रीजवर आहेत.
दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 60 चेंडूत 77 धावा करायच्या आहेत.
तर टीम इंडियाला अजून 7 विकेट्स पाहिजे.
मार्कराम अन् बावुमाची जोडी रंगात दिसत आहे, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 90 च्या पुढे गेली आहे.
सुरुवातीच्या पराभवानंतर, बावुमा आणि मार्कराम यांनी दक्षिण आफ्रिकेला सावरले.
भारत आता विकेटच्या शोधात आहे.
15 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 94 धावा आहे.
कोहली आणि ऋतुराज गायकवाडच्या शतकांच्या आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचे लक्ष्य ठेवले.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
गायकवाडच्या 105, कोहलीच्या 102 आणि राहुलच्या नाबाद 66 धावांच्या जोरावर भारताने 50 षटकांत 5 बाद 358 धावा केल्या.
टीम इंडियाला पाचवा धक्का 289 धावांवर बसला.
केएल राहुल आणि जडेजा क्रीजवर आहेत.
41 षटकांनंतर भारताचा स्कोअर 289 धावा आहे.
वॉशिंग्टन सुंदर एका धावेवर धावबाद झाला.
त्याआधी विराट कोहली 102 धावांवर तर ऋतुराज 105 धावांवर बाद झाला.
विराट कोहलीने ऋतुराजसोबत तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली.
विराट कोहली 102 धावांवर बाद झाला.
कोहलीने 93 चेंडूत 102 धावा केल्या, त्यात 7 चौकार आणि 2 षटकार मारले.
त्याने ऋतुराजसोबत तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली.
ऋतुराज 105 धावांवर बाद झाला.
जानसेनने ऋतुराज गायकवाडला आऊट केले.
तो 83 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकारांसह 105 धावा काढून बाद झाला.
ऋतुराज आणि कोहलीने 156 चेंडूत तिसऱ्या विकेटसाठी 195 धावा केल्या.
ऋतुराजच्या अर्धशतकानंतर विराट कोहलीने 47 चेंडूत हा टप्पा गाठला.
हे त्याचे 76 वे एकदिवसीय अर्धशतक होते.
कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
25 षटकांनंतर, भारताचा स्कोअर 2 बाद 158 आहे.
कोहली आणि ऋतुराजसध्या क्रीजवर आहेत.
ऋतुराज पण 51 धावांवर खेळत आहे.
दोघांनी आता 96 धावांची भागीदारी केली आहे.
रोहित 14 धावा काढून बाद झाला आणि यशस्वी 22 धावा काढून बाद झाला.
भारताची धावसंख्या 2/62 होती, तेव्हा ऋतुराज मैदानात आला.
त्याने चौथ्या क्रमांकावर दबावाखाली एक शानदार अर्धशतक पूर्ण केले.
50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये एका क्लासिक खेळाडूची ही उत्कृष्ट खेळी आहे.
15 षटकांत, ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली यांनी 32 चेंडूंत 34 धावांची भागीदारी केली. विकेट पडल्यानंतर, या जोडीने डाव सावरला.
भारताचा धावसंख्या - 96/2 (15 षटकांत)
विराट कोहली - 20* (22)
ऋतुराज गायकवाड - 27* (22)
भारतीय डावातील दहा षटके पूर्ण झाली आहेत.
टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली.
कोहलीही आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.
भारताचा स्कोअर - 66/2 (10 षटके)
विराट कोहली - 13* (12)
ऋतुराज गायकवाड - 4* (2)
भारताकडून डावाची सुरुवात करणारा यशस्वी जैस्वाल पुन्हा अपयशी ठरला.
त्याने 38 चेंडूत 22 धावा केल्या.
मार्को जॅनसेनने त्याला आऊट केले.
यासोबतच भारताने 62 धावांवर आपला दुसरा विकेट गमावला.
भारतीय संघाला रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला.
रोहित आणि यशस्वी यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.
परंतु नांद्रे बर्गरने रोहितला आऊट केले.
बर्गरने अपील केले, परंतु मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद घोषित केले.
मग दक्षिण आफ्रिकेने रिव्ह्यू घेतला आणि रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू रोहितच्या बॅटच्या कडेला लागून डी कॉकच्या हातात गेला.
अशा प्रकारे रोहितचा डाव संपला.
8 चेंडूत तीन चौकारांसह 14 धावा करून रोहित बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची फलंदाजी सुरू झाली आहे.
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, मॅथ्यू ब्रिएत्झके, टोनी डी जिओर्गी, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.
दरम्यान, भारतीय कर्णधार केएल राहुलने सांगितले की, त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल नाहीत.
बावुमाने सांगितले की त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल आहेत.
बावुमा परतला आहे, तर लुंगी एनगिडी आणि केशव महाराज यांचाही समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेने रायन रिकेल्टन, प्रेनालन सुब्रायन आणि बार्टमन यांना वगळले आहे.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचा अर्थ भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल.
आज (3 नोव्हेंबर) भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे.
रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर भारत आणि दक्षिण अफ्रिकेत सामना रंगेल.
दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील सामने डीडी स्पोर्टसवर मोफत पाहता येतील.
भारताने आतापर्यंत रायपूरमध्ये एक एकदिवसीय सामना खेळला आहे.
भारताने न्यूझीलंडविरुद्धचा तो सामना 179 चेंडू शिल्लक असताना 8 विकेट्सने जिंकला.
दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच रायपूरमध्ये खेळणार आहे.
दरम्यान, टीम इंडियाला रायपूरमध्ये फक्त एका एकदिवसीय सामन्याचा अनुभव आहे.
- मुख्यपृष्ठ
- क्रीडा
- क्रिकेट
- IND vs SA 2nd ODI LIVE Score : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय, वनडे मालिकेत बरोबरी