- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
IND vs SA 1st ODI : कुलदीप यादवचा विकेट्सचा 'चौकार', रोमांचक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी केला पराभव
IND vs SA 1st ODI Scorecard Update Marathi : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे.
पार्श्वभूमी
India vs South Africa 1st ODI Live Cricket Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज रांची येथे खेळला जात आहे. दोन वर्षांच्या अनुपस्थितीनंतर...More
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला.
रांची येथे खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दोन्ही डावात एकूण 681 धावा झाल्या.
ज्यामध्ये विराट कोहलीने त्याचे 83 वे आंतरराष्ट्रीय शतक आणि 52 वे एकदिवसीय शतक ठोकले.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 349 धावा केल्या.
प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिका लक्ष्यापासून 17 धावांनी कमी पडली.
भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार बळी घेतले.
कुलदीप यादवने भारताला सामन्यात परत आणले.
त्याने मार्को जॅनसेन (70) आणि मॅथ्यू ब्रीट्झके (72) यांना 32व्या षटकात बाद केले.
दोघांनी 97 धावांची भागीदारी केली.
मार्को जॅनसेनने 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ब्रीट्झकेसोबत 69 धावांची भागीदारी केली.
रांचीत हर्षित राणाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच षटकात 2 मोठे धक्के दिले.
डावाच्या दुसऱ्या षटकात हर्षित राणा गोलंदाजी करण्यासाठी आला.
तेव्हा त्याने पहिल्याच चेंडूवर रायन रिकेलटनला आऊट केले, तो खातेही उघडू शकला नाही.
तिसऱ्या चेंडूवर हर्षित राणाने क्विंटन डी कॉकला बाद केले. तोही आपले खाते उघडू शकला नाही.
मॅथ्यू ब्रीट्झके आता मार्करामला साथ देण्यासाठी मैदानात आला आहे.
विराट कोहलीच्या शतकासह रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अर्धशतकांमुळे भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 350 धावांचे लक्ष्य ठेवले.
रांची येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने 50 षटकांत आठ गडी गमावून 349 धावा केल्या.
केएल राहुलने 50 चेंडूत त्याचे 19 वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले.
47 षटकांनंतर भारताचा स्कोअर 5 विकेटसाठी 329 धावा आहे.
भारताला पाचवा धक्का विराट कोहलीच्या रूपात बसला.
या सामन्यात किंग कोहली 120 चेंडूत 135 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
या दरम्यान त्याने 11 चौकार आणि सात षटकार मारले.
रवींद्र जडेजा आता केएल राहुलला साथ देण्यासाठी आला आहे.
43 षटकांनंतर भारताचा स्कोअर 5 विकेटसाठी 277 धावा आहे.
विराट कोहलीने फक्त 102 चेंडूत त्याचे 52 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले.
तो अजूनही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
हे त्याच्या कारकिर्दीतील 83 वे शतक आहे.
39 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 बाद 254 आहे.
रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर भारताला तिसरा मोठा धक्का बसला आहे,
ऋतुराज गायकवाड फक्त आठ धावांवर बाद झाला.
ओटनील बार्टमनने तिला आऊट केले.
28 षटकांनंतर भारताची धावसंख्या 3 बाद 193 आहे.
भारताला दुसरा धक्का रोहित शर्माच्या रूपात बसला, जो मार्को जानसेनने एलबीडब्ल्यू केला.
तो 51 चेंडूत 57 धावा काढून बाद झाला.
हिटमॅनने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली.
आता कोहलीसोबत ऋतुराज गायकवाड आला आहे.
22 षटकांनंतर भारताची धावसंख्या 2 बाद 163 आहे.
कोहली पाठोपाठ, रोहित शर्मानेही अर्धशतक झळकावले.
त्याने 43 चेंडूत त्याचे 60 वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
कोहली आणि रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तुफानी फटकेबाजी करत आहे.
दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे.
कोहली त्याच्या जुन्या लयीत परतला आहे आणि आक्रमक फलंदाजी करत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या 10 षटकात टीम इंडियाने 80 धावा ठोकल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने फलंदाजीला सुरुवात केली आहे.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली.
पहिल्या 3 षटकांत भारताने एकही विकेट न गमावता 25 धावा केल्या.
पण टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
नांद्रे बर्गरने चौथा षटकातील पहिल्या चेंडूवर यशस्वी जैस्वालला बाद करून भारताला पहिला धक्का दिला आहे.
रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेव्हिस, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, प्रिनेलन सुब्रेन, नांद्रे बर्गर, ओटनील बार्टमन
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
केएलने पुष्टी केली की या सामन्यासाठी ऋतुराज गायकवाड प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, तर यशस्वी जैस्वाल रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करेल.
भारतीय कर्णधार केएल राहुलनेही नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता असे म्हटले.
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- मुख्यपृष्ठ
- क्रीडा
- क्रिकेट
- IND vs SA 1st ODI : कुलदीप यादवचा विकेट्सचा 'चौकार', रोमांचक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी केला पराभव