IND vs PAK Asia Cup 2023 LIVE: डावखुऱ्या शाहीन आफ्रिदीची हवा शुभमन गिल याने काढली आहे. शाहीन आफ्रिदीची गोलंदाजी गिल याने फोडून काढली. शाहीन याच्या गोलदाजीवर गिल याने चौकारांचा पाऊस पाडला. शाहीन पहिल्या तीन षटकात महागडा ठरला. गिल आणि रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. शाहीन भारतासाठी सर्वात धोकादायक गोलंदाज असल्याचे सर्वांकडून कौतुक होत होते. पण आज शुभमन गिल याने शाहीन आफ्रिदीची हवा काढली. शाहीन याच्या 12 चेंडूत गिल याने सहा चौकार मारत पिटाई केली. 


रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली. शाहीन आफ्रिदी पहिले षटक घेऊन आला होता. पहिल्या पाच चेंडूवर रोहित शर्मा याला धाव घेता आली नाही. पण अखेरच्या चेंडूवर रोहित शर्माने खणखणीत षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. पण रोहित शर्मापेक्षा शुभमन गिल आक्रमक दिसला. शुभमन गिल याने शाहीन आफ्रिदीचा समाचार घेतला. शुभमन गिल याने शाहीनच्या 12 चेंडूचा सामना केला. या 12 चेंडूमध्ये गिल याने आफ्रिदीला सहा चौकार लगावत 24 धावा वसूल केल्या. शाहीन आफ्रिदी सुरुवातीला विकेट घेण्यासाठी प्रसिद्ध आहे, पण आजच्या सामन्यात त्याची पिटाई झाली. शाहीन आफ्रिदी याने तीन षटकात 31 धावा खर्च केल्या. पण एकही विकेट घेता आली नाही. गिल याने शाहीन आफ्रिदीची लाईन लेंथ बदलून टाकली. गिलचे आक्रमक रुप पाहून कर्णधार बाबर आझम याने शाहीन आफ्रिदीला गोलंदाजीपासून थांबवावे लागले.  


भारताने प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. पाकिस्तानकडून नसीम शाह याने भेदक मारा केला. पण भारतीय फलंदाजांनी शाहीन आफ्रिदीला टार्गेट केले.  भारतीय संघाने सहाच्या सरासरीने धावांचा पाऊस पाडला.  भारताने आठ षठकानंतर बिनबाद 47 धावा केल्या आहेत. शुभमन गिल 24 चेंडूत 35 धावा काढून खेळत आहे. यामध्ये आठ चौकारांचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मा 24 चेंडूवर 10 धावांवर खेळत आहे.


शुभमन गिल याच्यावर सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव होतोय. नेटकरी गिल याचे कौतुक करत आहेत. मिम्स व्हायरल झाले आहेत.