Irfan Pathan On IND vs PAK Rain: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला पावसामुळे रद्द झाला. अनेक चाहत्यांच्या रंगाचा यामुळे बेरंग झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २६६ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताची आघाडीची फळी वेगवान माऱ्यापुढे अपयशी ठरली, पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी १३८ धावांची भागिदारी करत भारताला सन्मानजक धावसंख्या उभारुन दिली. इशान किशन ८२ तर हार्दिक पांड्याने ८७ धावांची खेळी केली. पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या. पाऊस आल्याचा फायदा कुणाला झाला...पाऊस आला नसता तर कोण जिंकले असते... यासारखी समीकरणे मांडली जाऊ लागली. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पाठण यानेही आपलं मत व्यक्त केले आहे. इरफान पाठण याने ट्वीट करत पावसामुळे भारताचे नुकसान झाल्याचे सांगितले. त्याने त्याबाबतचे स्पष्टीकरणही दिलेय. 


इरफान पठाण याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की,  "पाकिस्तानच्या स्पिनर्सनी 21 षटकांत एकही विकेट घेतली नाही. शिवाय 133 धावा दिल्या, हा गेम चेंजर होता. पाकिस्तानी फिरकीपटूंना एकही विकेट मिळाली नाही आणि ते महागडेही ठरले. जर भारताने गोलंदाजी केली असती आणि पाकिस्तानने 66 धावांवर 4 विकेट गमावल्या असत्या, तर भारताने वेगवान गोलंदाजांसह मारा चालू ठेवला असता, कारण टीम इंडियाकडे 4 वेगवान गोलंदाजांचा पर्याय होता.  तर पाकिस्तान तीन वेगवान गोलंदाजांसह खेळत होता. त्यामुळे मला वाटते की  उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर आणि पावसाचा व्यत्याय येत अशताना सरासरीपेक्षा जास्त धावा केल्यानंतर भारताची निराशा झाली.”







भारतासाठी आता करो या मरोची लढाई - 



पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करणं अनिवार्य आहे. अथवा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. नेपाळने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानविरोधात नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. त्यामुळे नेपाळ संघाला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.  भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 4 सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर अखेरचा साखळी सामना होणार आहे. यातील विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.