Mohammed Shami's ODI World Cup Record: न्यूझीलंडविरोधात मोहम्मद शामीने भेदक मारा करत पाच विकेट घेतल्या. शामीच्या पाच विकेटच्या बळावर भारताने न्यूझीलंडला 273 धावांत रोखले आहे. मोहम्मद शामी याला आतापर्यंत संघात स्थान मिळाले नव्हते, पण हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले. त्या संधीचे शामीने सोनं केले आहे. शामीने विश्वचषकात दुसऱ्यांदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा शामी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला विश्वचषकात दोन वेळा पाच विकेट घेता आल्या नाहीत.
हार्दिक पांड्या बांगलादेशविरोधात दुखापतग्रस्त झाला अन् टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोहम्मद शामीला स्थान मिळाले. भारतात होत असलेल्या विश्वचषकाच्या पहिल्या चार सामन्यात शामीला संघात स्थान मिळाले नव्हते. पण संधी मिळताच शामीने पाच विकेट घेतल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा 5 विकेट घेणारा शमी भारताचा पिहला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, माजी भारतीय दिग्गज कपिल देव, व्यंकटेश प्रसाद रॉबिन सिंह, आशिष नेहरा आणि युवराज सिंह यांनी विश्वचषकात एकदा पाच विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. शामी यांच्या पुढे गेला आहे. शामीने 2019 च्या विश्वचषकात एका डावात पाच विकेट घेतल्या होत्या.
शमीने 2019 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा 5 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर आजच्या सामन्यात शामीने 54 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या आहेत.
आज शमीने विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांना तंबूत धाडले.
वर्ल्ड कपमध्ये शामीची कामगिरी -
सामने- 12
विकेट- 36
सरासरी- 15.02
स्ट्राइक रेट- 17.6
इकॉनमी- 5.09
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारे भारतीय गोलंदाज -
2 वेळा- मोहम्मद शमी
1 वेळा- कपिल देव
1 वेळा- वेंकटेश प्रसाद
1 वेळा- रॉबिन सिंह
1 वेळा - आशीष नेहरा
1 वेळा- युवराज सिंह.
शमीचा मोठा पराक्रम
भारतीय संघाने 9व्या षटकात मोहम्मद शमीकडे गोलंदाजीची धुरा सोपवली आणि त्याने पहिला चेंडू योग्य रेषेवर टाकला आणि यंगला गोलंदाजी करून भारताला सामन्यातील दुसरे यश मिळवून दिले. यासह मोहम्मद शमी आता विश्वचषकाच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. शमीने भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेला मागे टाकले. ज्याने वर्ल्डकपमध्ये भारतासाठी 31 विकेट घेतल्या होत्या. आता शमीच्या नावावर 36विकेट्स झाल्या आहेत. टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जवागल श्रीनाथच्या नावावर आहे ज्याने 44 विकेट्स घेतल्या आहेत. झहीर खान दुसऱ्या स्थानावर असून त्याने वर्ल्ड कपमध्ये 44 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.