Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे 8 मार्च रोजी आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात रंगणार आहे. या महत्त्वाच्या लढतीसाठी दोन्ही संघांचे खेळाडू आधीच अहमदाबादला पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, तर भारताने इंग्लंडवर 7 धावांनी रोमांचक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अंतिम सामन्याच्या पिचकडे लागले आहे.

Continues below advertisement

दरम्यान, पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बसित अली याने आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना त्याने फायनल कोण जिंकणार याबाबत प्रतिक्रिया दिली.

बासित अली म्हणाला, “फायनल कोण जिंकणार हे कुणालाही आधी सांगता येत नाही. त्या दिवशी जो संघ चांगला खेळेल, तोच सामना जिंकेल.” अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे मैदान भारतीय संघासाठी लकी नाही, अशा चर्चांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “काही लोक म्हणतात की हे मैदान भारतासाठी लकी नाही. पण मी या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवत नाही. विक्रम हे मोडण्यासाठीच बनवले जातात. अशा चर्चा पूर्णपणे निरर्थक आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

Continues below advertisement

अभिषेक शर्माला दिला खास सल्ला

बासित अली यांनी युवा फलंदाज अभिषेक शर्मा यालाही महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सध्या ऑफ-स्पिन गोलंदाजांविरुद्ध त्याला अडचण येताना दिसत आहे. या स्पर्धेत अनेक वेळा विरोधी संघांनी त्याला याच पद्धतीने बाद केले आहे. या पार्श्वभूमीवर बासित अली म्हणाले की, अभिषेक मोठे शॉट मारण्याचा खूप प्रयत्न करत आहे. “तो जर बॅटची ग्रिप थोडी वरून पकडण्याऐवजी खाली पकडेल, तर बॅटवर त्याचा कंट्रोल अधिक चांगला येईल,” असा सल्ला त्यांनी दिला. 

बटलरने निवृत्ती घ्यावी का?

इंग्लंडकडून खेळणाऱ्या अनुभवी फलंदाज जोस बटलरकडून या स्पर्धेत मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र तो अपेक्षांप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर मत व्यक्त करताना बासित अली म्हणाले, “आयसीसी स्पर्धांमध्ये अशा चर्चा नेहमी होतात. तुम्ही बटलरबद्दल बोलत आहात की त्याने निवृत्ती घ्यावी. मीही अशी चर्चा ऐकली आहे. पण त्याच वेळी कोणी म्हणतं की अभिषेकला संघातून वगळा असं करायचं नसतं.”

हे ही वाचा -

Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11?, टीम इंडियाचा विश्वविजेता खेळाडू स्पष्ट बोलला...