IND vs NZ 3rd T20 LIVE : सामना अनिर्णीत, डीएलएस मेथडनं काढला निर्णय, भारतानं मालिका जिंकली
IND vs NZ 3rd T20 LIVE Updates: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी20 सामना खेळणार आहे.
पार्श्वभूमी
IND vs NZ, 3rd T20 Live : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आधी टी20 आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी दमदार असा विजय मिळवला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा टी20 सामना आज खेळवला जात आहे. भारताने आजचा सामना जिंकल्यास मालिकाही भारत जिंकेल. तर न्यूझीलंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटणार आहे.
भारतीय संघ आतापर्यंत 21 वेळा न्यूझीलंडसमोर (India vs New Zealand) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 21 पैकी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, न्यूझीलंड संघाला 9 सामनेच जिंकता आले आहेत. आजचा सामना होणाऱ्या मॅकलिन पार्क येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच अनुकूल आहे ज्यामुळे याठिकाणी पुन्हा एकदा फलंदाजांना मदत होईल अशी अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाजांना सामन्याच्या उत्तरार्धात अर्थात सेकंड इनिंगमध्ये काही मदत मिळू शकते, तर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू महत्त्वाची कामगिरी बजावतील.
टी20 मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 12 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा-
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -