IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात टी20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 12 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ज्यामुळे आजचा सामना भारताने गमावल्यास मालिकाही भारत गमावेल. आज होणारा दुसरा टी20 सामना लखनौच्या श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर (Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) खेळवला जात आहे. तर भारतासाठी करो या मरो चा हा सामना असल्याने या सामन्यापूर्वी मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे, अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ... 


लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. हे सर्व विजय काहीसे एकतर्फी झाले आहेत. अशा परिस्थितीत या स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक मदत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, रात्री दुसऱ्या डावात दव फॅक्टर गोलंदाजांना त्रास देऊ शकतो अशा स्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर कोणताही निर्णय घेणे कर्णधारासाठी सोपे नसेल.


कसं आहे लखनौचं हवामान?


आजचा सामना लखनौमध्ये खेळवला जात आहे. दरम्यान सामना होणाऱ्या ठिकाणच्या वातावरणाबद्दल हवामान खात्याने माहिती दिली असून सामन्यादरम्यान तापमान 13 ते 15 अंशांच्या दरम्यान राहील. विशेष  म्हणजे सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता नाही. म्हणजे सामन्यात कोणताही अडथळा न येता सामना पूर्ण षटकांचा होईल.


लखनौमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा आहे?


भारतीय संघ लखनौमध्ये दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून दोन्ही सामने जिंकले आहेत. दोन्ही वेळा भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 190+ धावा केल्या आहेत. भारताने येथे श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे.



न्यूझीलंडविरुद्ध भारताचा टी20 संघ







हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार 






हे देखील वाचा-