IND vs NZ : लखनौमध्ये सुरु भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारतानं अवघ्या 99 धावांत न्यूझीलंडला रोखलं आहे. संपूर्ण 20 षटकं खेळूनही न्यूझीलंड 8 विकेट्सच्या बदल्यात 99 धावाच करु शकला. ज्यामुळे भारताला विजयासाठी आता 120 चेंडूत 100 धावा करायच्या आहेत. विशेष म्हणजे सामन्यात भारताकडून एकूण 7 गोलंदाजांनी आज गोलंदाजी केली. ज्यात शिवम मावीने सोडता सर्वांनी किमान एक विकेट घेतली आहे.






न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या करुन भारतावर दबाव आणण्याचा त्यांचा डाव होता. पण भारतीय गोलंदाजांनी हा डाव हाणून पाडत केवळ 99 धावांतच न्यूझीलंडला रोखलं. न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनर याने सर्वाधिक 19 धावा केल्या. तर भारताकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय हार्दिक पांड्या, चहल, कुलदीप, सुंदर आणि दीपक हुडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


विशेष म्हणजे सामना होणाऱ्या लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. विषेश म्हणजे या क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. हे सर्व विजय काहीसे एकतर्फी झाले आहेत. अशा परिस्थितीत या स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक मदत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेत किवी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांचा हा निर्णय साफ फसल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय भारतीय संघाचा याठिकाणी विचार करता टीम इंडिया लखनौमध्ये दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजही भारताचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.


दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन:


भारत : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग


न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब टफी, ब्लेअर टिकनर. 


हे देखील वाचा-