IND Vs IRE, 2nd T20 Live : भारत-आयर्लंड दुसरा सामना आज, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IND Vs IRE Live Score : भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये आज दुसरा टी20 सामना होत आहे. भारताने पहिल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार दोन धावांनी विजय मिळवला होता.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 20 Aug 2023 10:53 PM
भारताचा आयर्लंडवर 33 धावांनी विजय

भारताचा आयर्लंडवर 33 धावांनी विजय... मालिकाही जिंकली

आयर्लंडला आठवा धक्का

आयर्लंडला आठवा धक्का...  भारत विजयाच्या जवळ

आयर्लंडला सातवा धक्का

आयर्लंडला सातवा धक्का बसलाय. मोक्याच्या क्षणी बुमराहने विकेट घेतली.

आयर्लंडला मोठा धक्का

अर्शदीप सिंह याने मोक्याच्या क्षणी एंड्रयू बालबर्नी याला बाद करत भारताला मोठं यश मिळवून दिले. 

आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत

आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत परतलाय. मोक्याच्या क्षणी विकेट पडली. आयर्लंड पाच बाद 115 धावा

एंड्रयू बालबर्नी याचे अर्धशतक

एंड्रयू बालबर्नी एकाकी लढा दिलाय.. त्याने 43 चेंडूत अर्धशतक ठोकले.  आयर्लंड चार बाद 97 धावा

रवि बिश्नोईचा भेदक मारा

रवि बिश्नोईने आयर्लंडला दोन धक्के दिले. तीन षटकात 24 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. आयर्लंडने चार विकेटच्या मोबद्लयात 81 धावा केल्यात. 

आयर्लंडला लागोपाठ दुसरा धक्का

कृष्णाने एकाच षटकात घेतल्या दोन विकेट... आयर्लंड दोन बाद 19 धावा

आयर्लंडला पहिला धक्का

पॉल स्टर्लिंगच्या रुपाने आयर्लंडला पहिला धक्का बसला आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर स्टर्लिंग बाद झालाय. 

ऋतुराज-संजूने डाव सावरला

यशस्वी जायस्वाल आणि तिलक वर्मा लागोपाठ तंबूत परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ऋतुराज गायकवाड याने 43 चेंडूत 58 धावांची झंझावती खेळी केली. तर संजू सॅमसन याने 26 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड याने एक षटकार आणि चार चौकार ठोकले. तर संजू सॅमसन याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 49 चेंडूत 71 धावांची दमदार भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. त्याआधी यशस्वी जायस्वाल याने 11 चेंडूत 18 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. तिलक वर्मा याला आजच्या सामन्यातही लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. पहिल्या सामन्यात तिलक वर्मा गोल्डन डकचा शिकार झाला होता. तर आजच्या सामन्यात तिलक वर्मा याला फक्त एक धाव करता आली. 

रिंकू-शिवमची दमदार खेळी - 

आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. रिंकू सिंह याने 21 चेंडूत 38 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. तर शिवम दुबे याने 16 चेंडूत दोन षटकाराच्या मदतीने नाबाद 22 धावा जोडल्या. मोक्याच्या क्षणी रिंकू आणि शिवम यांनी वेगाने धावा केल्या.

रिंकू-शिवमचा फिनिशिंग टच 

युवा रिंकू सिंह आणि शिवम मावी यांनी भारताला जबरदस्त फिनिशिंग दिली. अखेरच्या काही षटकार या जोडीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत भारताची धावसंक्या 180 च्या पार पोहचवली.  रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी अवघ्या 28 चेंडूत 55 धावांची भागिदारी केली. यामध्ये रिंकूने 12 चेंडूत 28 चक शिवम याने 16 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. 

आयर्लंडपुढे 186 धावांचे आव्हान

IND Vs IRE, Innings Highlights : ऋतुराज गायकवाडचे दमदार अर्धशतक आणि शिवम-रिंकूचा फिनिशिंग टचच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात 185 धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाड याने 58 धावांची खेळी केली. संजू सॅमसन याने 40 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंह याने झटपट 38 धावांचे योगदान दिले. आयर्लंडपुढे विजयासाठी 186 धावांचे आव्हान आहे. 

भारताचा अर्धा संघ तंबूत परतला

भारताचा अर्धा संघ तंबूत परतला... रिंकू सिंह 38 धावांवर बाद

ऋतुराज-संजूने डाव सावरला

यशस्वी जायस्वाल आणि तिलक वर्मा लागोपाठ तंबूत परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ऋतुराज गायकवाड याने 43 चेंडूत 58 धावांची झंझावती खेळी केली. तर संजू सॅमसन याने 26 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड याने एक षटकार आणि चार चौकार ठोकले. तर संजू सॅमसन याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 49 चेंडूत 71 धावांची दमदार भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. त्याआधी यशस्वी जायस्वाल याने 11 चेंडूत 18 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. तिलक वर्मा याला आजच्या सामन्यातही लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. पहिल्या सामन्यात तिलक वर्मा गोल्डन डकचा शिकार झाला होता. तर आजच्या सामन्यात तिलक वर्मा याला फक्त दोन धावा करता आल्या. 

भारताचे चार गडी तंबूत

16 षटकात 133 धावांच्या मोबदल्यात भारताने चार विकेट गमावल्या आहेत. 

भारताला दुसरा धक्का

तिलक वर्मा दुसऱ्या सामन्यातही फ्लॉप..... एका धावेंवर झाला बाद.... भारत दोन बाद 34 धावा

भारताला पहिला धक्का

भारताला पहिला धक्का बसला आहे. यशस्वी जायस्वाल याला यंग याने बाद केलेय. भारत एक बाद 30 धावा

यशस्वी-गायकवाडची दमदार सुरुवात

दुसऱ्या टी20 सामन्यात यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार सुरुवात केली. 2.3 षटकात 21 धावा केल्या आहेत. 

यशस्वी-गायकवाड मैदानावर

यशस्वी-गायकवाड मैदानावर... भारताची फलंदाजी सुरु

दोन्ही संघात बदल नाहीच


पहिला सामना झाला तिथेच डबलिन येथे दुसरा टी 20 सामना होत आहे.  दुसऱ्या टी 20 सामन्यात यजमान आयर्लंडने नाणेफेक जिंकून पाहुण्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. या सामन्यासाठी बुमराहने भारतीय संघात कोणताही बदल केला नाही. पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे. त्याशिवाय आयर्लंडच्या संघातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

आयर्लंडची प्लेईंग 11

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, लोर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅक्कार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटिल आणि बेंजामिन व्हाइट. 

भारताची प्लेईंग 11 : 

 



ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा

भारताची प्रथम फलंदाजी

दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. पॉल स्टर्लिंग याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. 

आयर्लंडने नाणेफेक जिंकली

आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याने नाणेफेक जिंकली

पार्श्वभूमी

IND Vs IRE 2nd T20 Live Updates : भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये आज दुसरा टी20 सामना होत आहे. भारताने पहिल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार दोन धावांनी विजय मिळवला होता. आज दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरले. तर दुसरीकडे आयर्लंडचा संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी भेदक मारा केला होता. त्याला रवि बिश्नोई याच्या फिरकीची जोड मिळाली होती. आजच्याही सामन्यात यांच्याकडून चांगल्या गोलंदाजीची आपेक्षा असेल. अर्शदीप सिंह पहिल्या सामन्यात महागडा ठरला होता, आज त्याच्या कामगिरीत सुधारणा होईल, अशी क्रीडा चाहत्यांना आपेक्षा आहे. 


दुसरीकडे आयर्लंडला आपल्या फलंदाजीवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडची आघाडीची फळी ढेपाळली होती. अवघ्या 31 धावांत आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. लोअर ऑर्डरच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडचा संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचला होता. आज आघाडीच्या फळीकडून मोठ्या खेळीची आपेक्षा असेल. 


भारतीय फलंदाजांना पहिल्या सामन्यात तितका वाव मिळाला नव्हता. सहा षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली होती. यशस्वी जायस्वाल याने दमदार सुरुवात केली होती. ऋतुराजने त्याला चांगली साथ दिली होती. तिलक वर्मा मात्र गोल्डन डकचा शिकार झाला होता. आज होणाऱ्या सामन्यात भारताच्या युवा खेळाडूंकडून मोठ्या खेळीची आपेक्षा असेल. 


कुठे पाहणार लाईव्ह ? 









कधी सुरु होणार सामना ?


भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी 20 सामने रात्री साडेसात वाजता सुरु होणार आहेत. सात वाजता नाणेफेक होईल. 


आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक -


भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.  तिन्ही सामने डबलिन येथेच होणार आहेत. 18 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. या सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळवला होता. आज डबलिन येथे दुसरा टी20 सामना होणार आहे.  23 ऑगस्ट रोजी तिसरा टी 20 सामना डबलिन येथेच होणार आहे. 


दोन्ही संघाचे शिलेदार कोण कोण ?


भारत : 


जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान.


आयर्लंड : 


पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, रॉस एडेयर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँफर, जॉर्ज डॉकरेल, फियोन हँड, लोर्कन टकर (विकेटकीपर), मार्क एडेयर, जोशुआ लिटिल, बॅरी मॅकार्थी, थियो वॅन वोर्कॉम, बेंजामिन व्हाइट, क्रेग यंग.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.