ind vs ire 2nd t20 dublin weather : भारत आणि आयर्लंड यांच्यात आज दुसरा टी 20 सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी सात वाजता नाणेफेक होईल. डबलिनच्या मैदानात भारत आणि आयर्लंड संघ मैदानात उतरणार आहेत. याच मैदानावर पहिला टी 20 सामना झाला होता. पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. दुसऱ्या सामन्यातही पाऊस विलेन होण्याची शक्यता आहे का? पाहूयात डबलिन येथील हवामानाचा अंदाज काय आहे... सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे का ?
आयर्लंड येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे. त्याआधी अर्धा तास नाणेफेक होईल. पावसामुळे पहिला टी 20 सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. पण दुसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता कमीच आहे. आज डबलिनमधील हवमान साफ असेल, असे स्थानिक हवामान विभागाने सांगितलेय.
एक्यूवेदर वेबसाइटनुसार, डबलिनमध्ये दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हवामान साफ असेल, पावसाची शक्यता नाही. दरम्यान, पावसाची शक्यता नसल्यामुळे चाहत्यांना आजचा सामना पूर्ण पाहण्याची संधी मिळणार आहे. आजच्या सामन्याचा क्रीडाप्रेमी आनंद घेऊ शकतात.
पहिल्या सामन्यात पावसाचा खोडा, भारताचा दोन धावांनी विजय
18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी 20 सामना झाला होता. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. डकवर्थ लुईस नियमांनुसार, हा सामना भारताने दोन धावांनी जिंकला होता. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 140 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्यु्त्तरदाखल भारातने 6.5 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात 47 धावा केल्या होत्या. त्यादरम्यान डबलिन येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा सामना सुरु होऊ शकला नाही. सामना थांबला तेव्हा भारतीय संघ डकवर्थ लुईस नियमांनुसार दोन धावांनी पुढे होता. त्यामुळे भारतीय संघाला दोन धावांनी विजयी घोषीत करण्यात आले. आजच्या सामन्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे सामना पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक -
भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. तिन्ही सामने डबलिन येथेच होणार आहेत. 18 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. या सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळवला होता. आज डबलिन येथे दुसरा टी20 सामना होणार आहे. 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी 20 सामना डबलिन येथेच होणार आहे.