IND Vs IRE, 1st T20 Live : युवा भारतीय टीमसमोर आयर्लंडचे आव्हान, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
IND Vs IRE Live Score : भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) टी20 मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
भारताचा दोन धावांनी विजय
पावसामुळे सामना थांबण्यापूर्वी भारतीय फंलदाजांनी अश्वासक सुरुवात केली. भारत दोन बाद 47 धावा... ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन मैदानावर आहे. ऋतुराज गायकवाड 19 धावांवर खेळत आहे. यशस्वी जायस्वाल 24 धावा काढून बाद झाला. या छोेटेखानी खेळीत यशस्वीने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.
आय़र्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात पावसाची हजेरी
यशस्वी-ऋतुराजकडून दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकात या जोडीने 10 धावा चोपल्या.
अखेरच्या षटकात अर्शदीप सिंह याने खराब गोलंदाजी केली. अर्शदीप सिंह याने अखेरच्या षटकात तब्बल 22 धावांची लयलूट केली. अर्शदीपच्या अखेरच्या षटकात McCarthy याने अर्शदीपची गोलंदाजी फोडून काढली. त्याने दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 22 धावा चोपल्या. जसप्रीत बुमराह याने 19 व्या षटकात भेदक मारा करत आयर्लंडच्या गोलंदाजांना थोपवलं होतं. बुमराहने 19 व्या षटकात फक्त एक धाव देत धावसंख्येला आवर घातली होती. पण बुमराहच्या मेहनतीवर अर्शदीप सिंह याने पाणी फेरले.
आयर्लंडची 139 धावांपर्यंत मजल
आयर्लंडला सातवा धक्का बसलाय.. अर्शदीपने घेतली विकेट
अवघ्या 62 धावांत आयर्लंडचे सहा फलंदाज तंबूत परतलेत.
भारताच्या भेदक माऱ्यापुढे आय़र्लंडचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले. आयर्लंडने 50 धावांच्या आतच 5 विकेट गमावल्यात.
आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत परतलाय..
27 धावांत आयर्लंडचे चार फलंदाज तंबूत परतले. कर्णधार पॉल स्टर्लिंगही बाद झालाय.
आयर्लंडने चार षटकांनंतर 2 बाद 22 धावा केल्या आहेत. कर्णधार पॉल स्टर्लिंग आणि हॅरी टेक्टर मैदानात आहेत.
जसप्रीत बुमराहच्या वेगवान माऱ्यापुढे आयर्लंडची फलंदाजी ढेपाळली. पहिल्याच षटकात दोन फलंदाज माघारी परतले.
बुमराचा भेदक मारा.... पहिल्याच षटकात दुसरी विकेट
बुमराहचे दणक्यात पुनरागमन.. पहिल्याच षटकात घेतली विकेट
आयर्लंडचे फलंदाज मैदानात उतरले आहेत. जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी सज्ज
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, लोर्कन टकर (विकेटकीपर), हैरी टेक्टर, कर्टिस कैम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅक्कार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटिल आणि बेंजामिन व्हाइट.
ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा
भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने आयर्लंड विरोधात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान आयर्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले. रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतीय संघात पदार्पण झालेय.
जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकली.. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकली.. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे टी 20 मध्ये पदार्पण झालेय.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या वृत्तानुसार सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारत :
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान.
आयर्लंड :
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, रॉस एडेयर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँफर, जॉर्ज डॉकरेल, फियोन हँड, लोर्कन टकर (विकेटकीपर), मार्क एडेयर, जोशुआ लिटिल, बॅरी मॅकार्थी, थियो वॅन वोर्कॉम, बेंजामिन व्हाइट, क्रेग यंग.
भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि आयर्लंड टी-20 मालिका शुक्रवारपासून सुरु होत आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी20 सामना रंगणार आहे.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी 20 सामने रात्री साडेसात वाजता सुरु होणार आहेत. सात वाजता नाणेफेक होईल.
भारत आणि आयर्लंड यांच्यात होणाऱ्या तीन टी20 सामन्याची मालिका भारतात सपोर्ट्स 18 येथे लाईव्ह पाहता येतील. तर जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाईटकवरही सामन्यांचा आनंद घेता येईल. एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही सामन्यांसंदर्भात अपडेट मिळेल.
टीम इंडियाने आयर्लंड दौऱ्यासाठी रिंकू सिंहला संधी दिली आहे. त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. रिंकूने सोशल मीडियावर टीम इंडियाच्या जर्सीमधील फोटो शेअर केले आहेत. टीम इंडियासोबतच्या सरावादरम्यानचे हे फोटो आहेत. रिंकूने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसत आहे आणि त्याच्या हातामध्ये बॅट आहे.
18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा ट्वेंटी-ट्वेंटी सामना 20 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यात सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांना चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळाले आहे. या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद, शिवम दुबे यांनाही संधी देण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
IND Vs IRE Live Score : भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) टी20 मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. आजपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या (Team India) सिनियर खेळाडूंना आराम देण्यात आलाय. या मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारताचे कोणते शिलेदार मैदानात उतरणार ? याकडे लक्ष लागलेय.
युवा खेळाडूंना संधी -
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांना चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळाले आहे. या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद, शिवम दुबे यांनाही संधी देण्यात आली आहे.
भारताच्या सिनिअर खेळाडूंना आराम -
18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा ट्वेंटी-ट्वेंटी सामना 20 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यात सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.
रिंकू सिंहला पदार्पणाची संधी मिळणार?
टीम इंडियाने आयर्लंड दौऱ्यासाठी रिंकू सिंहला संधी दिली आहे. त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. रिंकूने सोशल मीडियावर टीम इंडियाच्या जर्सीमधील फोटो शेअर केले आहेत. टीम इंडियासोबतच्या सरावादरम्यानचे हे फोटो आहेत. रिंकूने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसत आहे आणि त्याच्या हातामध्ये बॅट आहे.
कुठे पाहणार लाईव्ह ?
भारत आणि आयर्लंड यांच्यात होणाऱ्या तीन टी20 सामन्याची मालिका भारतात सपोर्ट्स 18 येथे लाईव्ह पाहता येतील. तर जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाईटकवरही सामन्यांचा आनंद घेता येईल. एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही सामन्यांसंदर्भात अपडेट मिळेल.
कधी सुरु होणार सामना ?
भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी 20 सामने रात्री साडेसात वाजता सुरु होणार आहेत. सात वाजता नाणेफेक होईल.
भारत आणि आयर्लंड मालिका
भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि आयर्लंड टी-20 मालिका शुक्रवारपासून सुरु होत आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी20 सामना रंगणार आहे.
दोन्ही संघाचे शिलेदार कोण कोण ?
भारत :
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान.
आयर्लंड :
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, रॉस एडेयर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँफर, जॉर्ज डॉकरेल, फियोन हँड, लोर्कन टकर (विकेटकीपर), मार्क एडेयर, जोशुआ लिटिल, बॅरी मॅकार्थी, थियो वॅन वोर्कॉम, बेंजामिन व्हाइट, क्रेग यंग.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -