India vs England T20I Series: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. पराभवानंतर संघाचे अपयश कर्णधार विराट कोहलीने स्वीकारले आहे. विराट कोहली म्हणला की या खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी हे आमच्या फलंदाजांना समजले नाही.


विराट म्हणला, की अहमदाबादच्या खेळपट्टीवर त्यांचा चांगला दिवस नव्हता. "आम्हाला त्या खेळपट्टीवर काय करायचे हे माहित नव्हते. आमच्या शॉट्समध्ये प्लेसमेंटचा अभाव होता आणि आम्ही त्यावर मात केली पाहिजे. आम्ही आमच्या चुका स्वीकारल्या आहेत. फलंदाज म्हणून आम्हाला सुधारणा करणे आवश्यक आहे. खेळपट्टीवर आमचा दिवस चांगला नव्हता."


श्रेयश अय्यरची फलंदाजी उत्कृष्ट राहिली
यावेळी विराट कोहलीने श्रेयश अय्यरचे कौतुक केले. विराट म्हणाला, "आमच्यासाठी ही एक वाईट सुरुवात होती. मात्र, श्रेयसची खेळी आमच्यासाठी उत्तम उदाहरण आहे, की खेळपट्टीची खोली आणि बाऊन्सचा वापर करायचा आहे. त्याने उत्तम खेळी खेळली. पण, बाकीच्या फलंदाज तसे करण्यास अपयशी ठरले.


इंग्लंडने टी-20 मध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने शानदार गोलंदाजी करत भारताला 124 धावांवर रोखले. एवढेच नव्हे तर इंग्लंडने केवळ 15.3 षटकांत चांगल्या फलंदाजीद्वारे हे लक्ष्य गाठले. या विजयासह इंग्लंडने पाच ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचा पुढील सामना 14 मार्च रोजी खेळला जाईल.