IND vs ENG 4th Test Live: टीम इंडियाची पुन्हा निराशजनक कामगिरी, 191 धावांवर सगळा संघ गारद, विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर यांची अर्धशतकं

IND vs ENG 4th Test Score Live: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी ओव्हल येथे खेळली जात आहे. पुढील एक आठवडा ओव्हल हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 02 Sep 2021 09:36 PM
टीम इंडियाची पुन्हा निराशजनक कामगिरी, 191 धावांवर सगळा संघ गारद, विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर यांची अर्धशतकं

टीम इंडियाची पुन्हा निराशजनक कामगिरी, 191 धावांवर सगळा संघ गारद, विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर यांची अर्धशतकं

भारताची आघाडीची फळी तंबूत! 150 धावांवर 7 गडी बाद, कर्णधार विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाच्या 30 च्या पुढे धावा नाही.

भारताची आघाडीची फळी तंबूत! 150 धावांवर 7 गडी बाद, कर्णधार विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाच्या 30 च्या पुढे धावा नाही.

भारताचा निम्मा संघ अवघ्या 100 धावांत माघारी, कर्णधार विराट कोहली अर्धशतकानंतर बाद, आता अजिंक्य राहणे आणि ऋषभ पंतवर मदार

भारताचा निम्मा संघ अवघ्या 100 धावांत माघारी, कर्णधार विराट कोहली अर्धशतकानंतर बाद, आता अजिंक्य राहणे आणि ऋषभ पंतवर मदार

भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली! आघाडीचे तीन बॅट्समन माघारी, 54 धावांवर 3 बाद

भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली! आघाडीचे तीन बॅट्समन माघारी, 54 धावांवर 3 बाद

नमस्कार!

नमस्कार! भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेशी संबंधित एबीपी माझाच्या थेट ब्लॉगवर आपले स्वागत आहे. येथे आम्ही तुम्हाला दोन्ही संघांमधील कसोटीचे प्रत्येक लहान-मोठे अपडेट देत राहु, जे आजपासून ओव्हल येथे सुरू होत आहे. दोन्ही देशांमधील मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. लीड्सच्या पराभवानंतर भारताला कदाचित त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये बदल करावे लागतील. इंग्लंड संघात दोन बदलही होतील. सामन्याशी संबंधित सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या सोबत रहा.

पार्श्वभूमी

IND Vs ENG 4th Test: पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथी कसोटी आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे सुरू होत आहे. लीड्स येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत भारत एक डाव आणि 76 धावांनी पराभूत झाला. सध्या, दोन्ही देशांमधील मालिका 1-1 अशी बरोबरी आहे. सध्या, प्रत्येकाला भारताकडून पलटवार होण्याची अपेक्षा आहे.


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी सर्वात मोठी समस्या मधली फळी आहे. पुजारा आणि विराट कोहलीने लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतके ठोकली आहेत, पण रहाणेचा खराब फॉर्म कायम आहे. लीड्स कसोटीत रहाणेच्या जागी हनुमा विहारीला प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.


ख्रिस वोक्स आणि ओली पोप इंग्लंड संघात परतले आहेत. जोस बटलर आणि सॅम कुर्रनच्या जागी या दोघांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा आज भारतीय संघाचा भाग नाहीत. त्यांच्या जागी उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांना संधी मिळाली आहे.


टीम इंडियाची ओव्हलमध्ये अशी कामगिरी झाली आहे
लंडनमधील द ओव्हलमध्ये इंग्लिश संघाने नेहमीच टीम इंडियावर वर्चस्व राखले आहे. भारताला आतापर्यंत ओव्हलमध्ये फक्त एक विजय मिळाला आहे, जो 50 वर्षांपूर्वी 1971 मध्ये मिळाला होता. भारताने आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने पाच गमावले आहेत आणि सात सामने बरोबरीत सोडले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.