IND vs ENG 1st T20 : कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणारा भारतीय संघ टी 20 मालिकेसाठी तयार झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये गुरुवारपासून तीन सामन्याची टी 20 मालिका सुरु होत आहे. गुरुवारी तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना होणार आहे. हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल जाणून घेऊयात...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी20 सामना कुठे होणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी20 सामना द रोज बाउल, साउथेम्प्टन येथे होणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना किती वाजता सुरु होणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना गुरुवारी सात जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता सुरु होणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर (Sony Six आणि Sony Ten 3 ) पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामने पाहता येणार असून SonyLiv या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
प्रथम फलंदाजी की गोलंदाजी?
साउथेम्प्टनमधील रोज बाउल (The Rose Bowl, Southampton) मैदानावर आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ पाच वेळा जिंकलाय. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला चार वेळा विजय मिळलाय. या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या 168 इतकी आहे तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 143 इतकी आहे.
पहिल्या टी 20 मालिकेसाठी कुणाला आराम?
पहिल्या टी 20 सामनायासाठी काही खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. हे खेळाडू दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी भारतीय संघात असतील. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना पहिल्या टी20 सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, वेंटकेश अय्यर आणि अर्शदीप यांना पहिल्या टी20 साठी संघात स्थान मिळालेय.
प्रतिस्पर्धी संघ कसे आहेत?
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, ईशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, उमरान मलिक, युजवेंद्र चहल.
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), डेविड मलान, हॅरी ब्रूक, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, फील सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, डेविड विली, मॅट पार्किंसन, रीस टोप्ले, रिचर्ड ग्लीसन, टायमल मिल्स.