IND vs ENG Head To Head: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. साउथॅम्प्टनच्या (Southampton) द रोज बाउल (Rose Bowl) क्रिकेट स्टेडियमवर पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री 10.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. कोरोनामुळं बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातून बाहेर पडलेला भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या टी-20 मालिकेत पुन्हा कर्णधारपदाची सुत्रे हातात घेणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 सामन्यात कोणाचं पारडं जडं राहिलंय? यावर एक नजर टाकुयात.
भारत- इंग्लंड हेड टू रेकार्ड
टी-20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंडचा संघ आतापर्यंत 19 वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी 10 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, इंग्लंडच्या संघानं 9 सामने जिंकले आहेत. यातील 6 सामने भारताबाहेर खेळण्यात आले, ज्यात भारतानं चार सामने जिंकले आहेत. तर, दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021 मध्ये शेवटची टी-20 खेळण्यात आली. या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं 3-2 नं विजय मिळवला होता.
इंग्लडविरुद्ध अखेरच्या तीन टी-20 मालिकेतील भारताची कामगिरी-
मालिका कोणी जिंकली? | कधी |
भारतानं 2-1 अशी मालिका जिंकली | 2017 |
भारतानं 2-1 अशी मालिका जिंकली | 2018 |
भारतानं 3-2 अशी मालिका जिंकली | 2021 |
भारताचा टी-20 संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत कृष्णा बुमराह, ऋषभ पंत.
इंग्लंडचा टी-20 संघ-
बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन फोक्स, जॅक लीच, अॅलेक्स लीस, क्रेग ओव्हरटन, जेमी ओव्हरटन, मॅटी पॉट्स, ऑली पोप, जो रूट.