IND vs ENG Dream11 Prediction, India vs England T20 World Cup 2024 Playing XI : टी20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. गुरुवारी, 27 जून रोजी संध्याकाळी 8 (भारतीय वेळेनुसार) सामना सुरु होणार आहे. गयानाच्या प्रोव्हिडेंस स्टेडियमवर इंग्लंड आणि बारताचा आमनासामना ( IND vs ENG T20 World Cup 2024) होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया आतापर्यंत अजेय आहे.  गतविजेत्या इंग्लंडला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभवाचा सामना करावा लागलाय. या सामन्यावेळी अनेकजण फॅन्टेसी टीम तयार करत पैज लावतील. त्याचाच एक भाग म्हणून आम्हीही तुम्हाला टीम तयार करुन देत आहोत. पाहा मालामाल करणारे 11 खेळाडू  


रोहित शर्मा-जोस बटलर शानदार फॉर्मात - 


रोहित शर्मा आणि जोस बटलर शानदार लयीत आहेत. दोन्ही फलंदाज मैदानावर टिकले तर एकहाती सामना फिरवू शकतात. षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडणाऱ्या या फलंदाजांना तुम्ही कर्णधार अथवा उपकर्णधार करु शकता. जोस बटलरने या विश्वचषकात आतापर्यंत 6 डावात 47.75 च्या सरासरीने 191 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांची झंझावाती फलंदाजी केली होती. रोहित शर्मानेही 6 सामन्यात 192 धावा केल्या आहेत. 


भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट या विश्वचषकात शांत राहिली आहे. पण उपांत्य सामन्यात तो वादळी फलंदाजी करण्याची शक्यता आहे.   सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांनाही दडपणाखाली महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांनीही प्रभावी फलंदाजी केली आहे.


जसप्रीत बुमराह शानदार लयीत - 


भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह शानदार फॉर्मात आहे. बुमराहने सहा सामन्यात 11 विकेट घेतल्यात, त्याचा इकॉनॉमी फक्त 4 इतका आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि अर्शदीप यांनाही भेदक मारा केलाय. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन हे गोलंदाजही प्रभावी ठरु शकतात. भारताचा कुलदीप यादव आतापर्यंत शानदार लयीत दिसलाय. 


IND vs ENG, Dream 11 Prediction 1: भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याची ड्रीम 11 


कर्णधार : जोस बटलर 
उपकर्णधार: हार्दिक पंड्या 
विकेटकीपर: जोस बटलर, ऋषभ पंत, फिल सॉल्ट 
फलंदाज : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हॅरी ब्रूक 
अष्टपैलू : हार्दिक पंड्या, अक्षर पटेल 
गोलंदाज : कुलदीप यादव, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह 


-----------------------


कर्णधार: रोहित शर्मा 
उपकर्णधार: फिल सॉल्ट 
विकेटकीपर: जोस बटलर, ऋषभ पंत 
फलंदाज: फिल साल्ट, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव।
अष्टपैलू: हार्दिक पंड्या, सॅम करन।
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव 


नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.