Ind vs Eng 5th Test Day 4 : आता थांबायचं नाय! ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार, भारत 4 विकेट दूर, तर इंग्लंडला हव्या इतक्या धावा

Ind vs Eng 5th Test Day 4 Latest Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ओव्हल कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारताच्या दृष्टीने अत्यंत चांगला ठरला.

किरण महानवरLast Updated: 03 Aug 2025 10:49 PM

पार्श्वभूमी

India vs England Live Score 5th Test Day 4 Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ओव्हल कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारताच्या दृष्टीने अत्यंत चांगला ठरला. तिसऱ्या दिवसअखेर भारताने...More

इंग्लंड की टीम इंडिया कोण जिंकणार? पाचव्या दिवशी लागणार निकाल

ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 6 विकेट गमावून 339 धावा केल्या आहेत. पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. आता सामन्याचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार आहे. इंग्लंडला जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. दुसरीकडे, भारताला जिंकण्यासाठी 4 विकेटची आवश्यकता आहे, तर ख्रिस वोक्स फलंदाजी करेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर वोक्स फलंदाजी करू शकला नाही, तर टीम इंडियाने 3 विकेट घेतल्यानंतर लगेचच विजयी घोषित केले जाईल.