IND vs ENG, 5th Test : बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे तब्बल 257 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा 50 आणि ऋषभ पंत 30 धावांवर खेळत होते. दरम्यान, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा पहिला डाव 61.1 षटकांत 284 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावात भारताला 132 धावांची आघाडी मिळाली होती.

भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फलंदाज शुभमन गिल स्वस्तात माघारी परतला. गिल चार धावा करुन अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर पुजारा आणि हनुमा विहारीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पुजारा 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली 20 धावा काढून बाद झाला. विराट कोहलीला स्टोक्सने तर विहारीला स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. चेतेश्वर पुजाराने एका बाजूला संयमी फलंदाजी केली.  चेतेश्वर पुजाराने अर्धशतकी खेळी केली. दिवसअखेर ऋषभ पंत 30 धावांवर खेळत आहे. 

दरम्यान, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 61.1 षटकांत 284 धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकी खेळीच्या बळावर 416 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर गोलंदाजीत कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा केला. 

इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. 90 धावांच्या आत इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर जॉनी बेअरस्टो, कर्णधार बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स यांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडचा संघ 280च्या पुढे पोहचला. जॉनी बेअरस्टोनं दमदार शतकी खेळी केली. त्याने 140 चेंडूत 106 धावांची खेळी केली. त्याशिवाय, जो रुट 31, बेन स्टोक्स 25, सॅम बिलिंग्स 36 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमरहा आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा केली. सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शामीला दोन तर शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली. 

भारताचा दुसरा डाव 

फलंदाजी धावा चेंडू चौकार षटकार
शुभमन गिल  4 3 1 0
चेतेश्वर पुजारा (खेळत आहे) 50 139 5 0
हनुमा विहारी  11 44 1 0
विराट कोहली  20 40 4 0
ॠषभ पंत (खेळत आहे) 30 46 4 0
श्रेयस अय्यर        
रवींद्र जडेजा        
शार्दुल ठाकूर        
मोहम्मद शमी        
जसप्रीत बुमराह        
मोहम्मद सिराज        
अतिरिक्त धावा : 12 (B: 0, LB: 7, NB: 2, WD: 1, P:0) 125 (45.0)
गोलंदाजी षटक निर्धाव षटकं धावा विकेट
जेम्स अँडरसन 14 5 26 1
स्टुअर्ट ब्रॉड 12 1 38 1
मॅथ्यू पॉट्स 8 2 20 0
जॅक लीच 1 0 5 0
बेन स्टोक्स 7 0 22 1
जो रूट 3 1 7 0

इंग्लंडचा पहिला डाव (सर्वबाद - 284)

फलंदाजी धावा चेंडू चौकार षटकार
एलेक्स लीस   6 9 1 0
जैक क्राउली  9 17 1 0
ऑली पोप  10 18 2 0
जो रूट  31 67 4 0
जॉनी बेयरस्टो  106 140 14 2
जैक लीच  0 5 0 0
बेन स्टोक्स  25 36 3 0
सैम बिलिंग्स  36 57 4 0
स्टुअर्ट ब्रॉड  1 5 0 0
मैथ्यू पॉट्स  19 18 3 1
जेम्स एंडरसन नाबाद 6 10 1 0
अतिरिक्त : 48 (B: 16, LB: 5, NB: 13, WD: 1, P:0) 284 (61.3) RR: 4.62
गोलंदाजी षटकं निर्धाव षटकं धावा विकेट
जसप्रीत बुमराह 19 3 68 3
मोहम्मद शमी 22 4 78 2
मोहम्मद सिराज 11.3 2 66 4
शार्दूल ठाकुर 7 0 48 1
रवींद्र जडेजा 2 0 3 0

भारताचा पहिला डाव (सर्वबाद 416) -

फलंदाजी धावा चेंडू चौकार षटकार
शुभमन गिल  17 24 4 0
चेतेश्वर पुजारा  13 46 2 0
हनुमा विहारी  20 53 1 0
विराट कोहली  11 19 2 0
ॠषभ पंत  146 111 19 4
श्रेयस अय्यर  15 11 3 0
रवींद्र जडेजा 104 194 13 0
शार्दुल ठाकूर  1 12 0 0
मोहम्मद शमी  16 31 3 0
मोहम्मद सिराज 2 6 0 0
जसप्रीत बुमराह (नाबाद) 31 16 4 2

इंग्लंडची गोलंदाजी 

गोलंदाजी षटकं निर्धाव षटकं धावा विकेट
जेम्स अँडरसन 21.5 4 60 5
स्टुअर्ट ब्रॉड 18 3 89 1
मॅथ्यू पॉट्स 20 1 105 2
जॅक लीच 9 0 71 0
बेन स्टोक्स 13 0 47 1
जो रूट 3 0 23 1