IND vs ENG 3rd Test Live Score: मोठ्या अंतरानंतर इंग्लंडची दुसरी विकेट, रवींद्र जडेजाच्या शानदार चेंडूवर हसीब हमीद 68 धावांवर क्लीन बोल्ड

नमस्कार! भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेशी संबंधित एबीपी माझाच्या थेट ब्लॉगवर आपले स्वागत आहे. येथे आम्ही तुम्हाला तिसऱ्या कसोटी सामन्याची संपूर्ण परिस्थिती सांगू.

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 26 Aug 2021 05:16 PM
मोठ्या अंतरानंतर इंग्लंडची दुसरी विकेट

मोठ्या अंतरानंतर इंग्लंडची दुसरी विकेट, रवींद्र जडेजाच्या शानदार चेंडूवर हसीब हमीद 68 धावांवर क्लीन बोल्ड. इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 159

इंग्लंड भक्कम स्थितीत

इंग्लंड भक्कम स्थितीत, हमीद आणि मलान उत्तम फॉर्मात; एका गड्याच्या बदल्यात 159 धावा

डावखुरा फलंदाज डेव्हिड मलान सध्या चांगलाच फॉर्मात

तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा डावखुरा फलंदाज डेव्हिड मलान सध्या चांगलाच फॉर्मात आहे. तो 20 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 12 धावांवर खेळत आहे. दुसरीकडे, हसीब हमीद 180 चेंडूत 12 चौकारांसह 68 धावांवर आहे. इंग्लंडची एकूण धावसंख्या एक बाद 149 धावा झाली आहे.

नमस्कार!

नमस्कार! पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्सच्या हेंडिग्ले क्रिकेट मैदानावर खेळली जात आहे. या थेट ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला या सामन्याची नवीनतम स्थिती सांगत आहोत. सामन्याचा पहिला दिवस भारतासाठी अत्यंत वाईट होता. पहिल्या डावात भारतीय संघ केवळ 78 धावांवरच बाद झाला नाही, तर दिवसभराचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडला 42 धावांची आघाडी घेण्याची संधी दिली. सामन्याशी संबंधित सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्कात रहा.

हमीद आणि बर्न्सने इंग्लंडला दिली भक्कम सुरुवात, भारत विकेटच्या शोधत

हमीद आणि बर्न्सने इंग्लंडला दिली भक्कम सुरुवात, भारत विकेटच्या शोधत

इंग्लंडचा डाव सुरू, हसीब हमीद आणि रोरी बर्न्स क्रिजवर

पहिल्या डावात भारताला फक्त 78 धावांवर सर्वबाद केल्यानंतर आता इंग्लंडचे फलंदाज फलंदाजीसाठी उतरले आहेत. हसीब हमीद आणि रोरी बर्न्स इंग्लंडसाठी डावाची सलामी देण्यासाठी आले आहेत. त्याचबरोबर भारतीय कर्णधार विराट कोहलीने इशांत शर्माकडे चेंडू सोपवला आहे.

भारताचा डाव लवकर गुंडाळळा जाण्याची शक्यता!

भारताचा डाव लवकर गुंडाळळा जाण्याची शक्यता! सॅम कुरनने सलग दोन चेंडूंत दोन विकेट घेतल्यानंतर भारताची 9 वी विकेट पडली. भारताच्या 78 धावांवर 9 गडी बाद.

भारतीय संघ अडचणीत, अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

भारतीय संघ अडचणीत, अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, 36 ओव्हरनंतर 67 धावांवर 5 गडी बाद

पहिलं सत्रं इंग्लंडच्या नावे; भारताने केवळ 56 धावांवर चार विकेट गमावल्या

26 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भारताची चौथी विकेट पडली. अजिंक्य रहाणे 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला ऑली रॉबिन्सनने बाद केले. रहाणेच्या विकेटनंतर लगेचच लंचची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा 75 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 15 धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी, केएल राहुल 00, चेतेश्वर पुजारा 01 आणि विराट कोहली 07 धावा करून बाद झाले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने तीन बळी घेतले.

भारताला मोठा झटका, कर्णधार विराट कोहली अँडरसनच्या चेंडूवर बाद

भारताला मोठा झटका, कर्णधार विराट कोहली अँडरसनच्या चेंडूवर बाद. भारताची अवस्था 11 षटकांत 21 धावांवर 3 विकेट

भारताला दुसरा धक्का, अँडरसनने चेतेश्वर पुजाराला धाडलं माघारी

भारताला दुसरा धक्का, अँडरसनने चेतेश्वर पुजाराला धाडलं माघारी, 11 धावांवर 2 बाद, भारतीय संघ अडचणीत

लॉर्ड्सवर शतक ठोकणारा केएल राहुल आज खाते न उघडता बाद

लॉर्ड्सवर शतक ठोकणारा केएल राहुल आज खाते न उघडता बाद झाला. त्याला जेम्स अँडरसनने बाद केले. भारताची पहिली विकेट अवघ्या एका धावेवर गमावली आहे. आता चेतेश्वर पुजारा फलंदाजीला आला आहे. इंग्लंडला पहिल्याच षटकात यश मिळाले.

पार्श्वभूमी

IND vs ENG 3rd Test Score LIVE Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. लॉर्ड्स कसोटीत नेत्रदीपक विजयाची नोंद केल्यानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या संघाला तिसऱ्या कसोटीत आपली आघाडी मजबूत करण्याची संधी असताना, इंग्लंडचा संघ एकाच वेळी अनेक बदल करून मालिकेत दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.


जिंकल्यानंतरही विराट कोहलीसाठी प्लेईंग 11 खेळाडू निवडीची समस्या आहे. टीम इंडियाने आर अश्विनला पहिल्या दोन कसोटीत संधी दिलेली नाही. अश्विनसारखा स्टार फिरकीपटू जो फॉर्ममध्ये आहे त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय सोपा नाही. पण संघाच्या चार वेगवान गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे विराट अश्विनला तिसऱ्या कसोटीत संधी देतो की नाही, हे पाहणे खूप मनोरंजक असणार आहे.


विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा फॉर्मही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. या तीन खेळाडूंना या मालिकेत आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली जवळपास दोन वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये शतकाच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे, चेतेश्वर पुजाराने 2018 पासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले नाही.


मात्र, इंग्लंडचा संघ तिसऱ्या कसोटीत मोठ्या बदलांसह मैदानात उतरू शकतो. डेव्हिड मलान खेळण्यासाठी सज्ज झाला असून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. ऑली पोपला 6 व्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. इंग्लंड संघ तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानात उतरू शकतो.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.