IND vs ENG 3rd Test Day 3 Live : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला 2 धावांची आघाडी; टीम इंडिया 387 धावांवर ऑलआउट, केएल राहुलचं शतक
England vs India 3rd Test Lord's Update : लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे.
किरण महानवर Last Updated: 12 Jul 2025 11:06 PM
पार्श्वभूमी
India vs England, 3rd Test, Day 3, Live Score : लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडला 387 धावांवर...More
India vs England, 3rd Test, Day 3, Live Score : लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडला 387 धावांवर रोखल्यानंतर, टीम इंडियाने आपला पहिला डाव सुरू केला आणि केएल राहुलने दमदार अर्धशतक झळकावून संघाची धावसंख्या 145 धावांवर नेली. राहुल 53 धावा काढून नाबाद परतला, तर दुखापती असूनही फलंदाजीसाठी उतरलेला ऋषभ पंतही 19 धावा काढून नाबाद परतला. पण, टीम इंडियाने 3 विकेट गमावल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला 2 धावांची आघाडी; टीम इंडिया 387 धावांवर ऑलआउट
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीचा तिसरा दिवस संपला आहे. पहिल्या डावात भारताचा डाव 387 धावांवर संपला होता, तर दुसऱ्या डावात इंग्लंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत न गमावता दोन धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा जॅक क्रॉली 2 आणि बेन डकेट खाते न उघडता क्रीजवर होते.