IND vs ENG 2nd Test 4th Day : आकाश अन् सिराजचे धक्के सुरुच, इंग्लंड तीन विकेट गेल्यानं अडचणीत, भारताचा कसोटी विजय 7 पावलांवर

IND vs ENG 2nd Test 4th Day : भारत आणि इंग्लंड यांच्यातील बर्मिंघम येथील एजबेस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी केएल राहुल आणि करुण नायर मैदानावर उतरेल.

युवराज जाधव Last Updated: 05 Jul 2025 11:15 PM

पार्श्वभूमी

IND  vs ENG 2nd Test 4th Day : भारत आणि इंग्लंड यांच्यातील बर्मिंघम येथील एजबेस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी केएल राहुल आणि करुण नायर मैदानावर उतरतील. भारताकडे पहिल्या डावातील 180 धावांची...More

चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 3 बाद 72 धावा, घ्या काय घडलं?

बर्मिंघम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसावर भारताचं वर्चस्व राहिल्याचं दिसून आलं. केएल राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा यांची अर्धशतकं आणि कॅप्टन शुभमन गिलच्या 161 धावा या जोरावर भारतानं दुसऱ्या डावात 427 धावा केल्यानंतर डाव घोषित केला. भारतानं इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात भारतानं इंग्लंडला तीन धक्के दिले. आकाशदीपनं 2 विकेट घेतल्या. तर, मोहम्मद सिराजनं 1 विकेट घेतल्या.  भारताला बर्मिंघम कसोटी जिंकायची असेल तर इंग्लंडच्या राहिलेल्या 7 विकेट काढणं आवश्यक आहे.   


शुभमन गिलचं शतक


शुभमन गिलनं पहिल्या डावात द्विशतक करत 269 धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या डावात शुभमन गिलनं 161 धावा केल्या. गिलनं केएल राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा यांच्यासोबत भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली.  


केएल राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजाचं अर्धशतक


भारतीय संघ आज फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा करुण नायर आणि केएल राहुल मैदानात आले. करुण नायर आज देखील चांगली सुरुवात करुन 28 धावांवर बाद झाला. यानंतर शुभमन गिल मैदानात आला. दुसरीकडे केएल राहुलनं सलामीला येत संयमी खेळी करत 55 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या उपकॅप्टन रिषभ पंतनं 65 धावांची आक्रमक खेळी केली. यामध्ये शुभमन गिलनं तीन षटकार मारले. यानंतर भारताचा कॅप्टन शुभमन गिलनं शतक पूर्ण केलं. रवींद्र जडेजा देखील 69 धावांवर  नाबाद राहिला. 


भारताचा कॅप्टन शुभमन गिलनं 6 बाद 427 झाल्या असताना डाव जाहीर केला. यामुळं पहिल्या डावातील 180 मिळून इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं. 


सिराज आणि आकाशदीपचे इंग्लंडला धक्के


भारतानं 427 धावांवर डाव घोषित केल्यानं इंग्लंडलाला विजयासाठी 608 धावा करणं आवश्यक आहे. मात्र भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यानं दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या सलामीवीराला बाद केलं. सिराजनं क्रॉलीला बाद केलं. यानंतरआकाशदीपनं बेन डकेट आणि जो रुटला बाद केलं. बेन डकेट 25  धावांवर बाज झाला. तर जो रुट 6 धावांवर बाद झाला. आता भारताला विजय मिळवायचा असेल तर  7 विकेट घेणं आवश्यक आहे. इंग्लंड सध्या 3 बाद 72 धावांवर खेळत आहे.