India vs England Toss Update : इंग्लंडमधील लंडन येथील केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर पार पडणाऱ्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताने आपली अंतिम 11 देखील जाहीर केली असून यावेळी विराट कोहली संघात नसल्याचं समोर आलं आहे.

पहिला एकदिवसीय सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर पार पडत आहे. या ठिकाणची खेळपट्टी सपाट असल्याने फलंदाजांना अधिक फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे. पण अशामध्ये भारताने प्रथम गोलंदाजी घेतली असून इंग्लंडने एक मोठी धावसंख्या उभारल्यास भारताला चेस करणं अवघड होऊ शकतं. पण अशातच फलंजदाजीसाठी खेळपट्टी चांगली असल्याने भारत धावसंख्या गाठू शकण्याचीही शक्यता आहे. तर नेमकं काय होतं हे सामना सुरु झाल्यावरच कळेल, तर सामन्यासाठी  नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे, यावर एक नजर फिरवूया... 

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी 

इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जो रुट, मोईन अली, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड विली, आर. टोप्ले, क्रेग ओव्हरटन, ब्रायडन कार्स

एकदिवसीय मालिका वेळापत्रक- 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 12 जुलै ओव्हल 
दुसरा एकदिवसीय सामना 14 जुलै लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना 17 जुलै मँचेस्टर 

हे देखील वाचा-