India vs Bangladesh 2nd ODI Playing 11:  ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगलादेश नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) दुसरा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. तर, बांगलादेशच्या संघातही एक बदल पाहायला मिळालाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरलं आहे. दुसरीकडं बांगलादेशचा संघ दुसरा एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न आहे.


पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) आणि कुलदीप सेन (Kuldeep Sen) यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याऐवजी अक्षर पटेल (Axar Patel) आणि उमरान मलिकला (Umran Malik) प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी देण्यात आलीय. तर, बांगलादेशच्या संघानं हसन महमूदच्या जागेवर नसुम अहमदचा संघात समावेश केलाय. 


ट्वीट-






 


ट्वीट-






 


संघ-


भारताची प्लेइंग इलेव्हन: 
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक. 


बांगलादेशती प्लेइंग इलेव्हन:
 नजमुल हुसेन शांतो, लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, अफिफ हुसेन, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान.