Bangladesh vs India Shakib Al Hasan : भारताविरोधात मायदेशात होणाऱ्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेशच्या संघात अष्टपैलू शाकिब अल हसन, वेगवान गोलंदाज इबादत हुसैन आणि ऑफ स्पिनर यासिर अली यांचं पुनरागमन झालेय.
कोणत्या मैदानावर होणार सामने?
बांगलादेश आणि भारत यांच्यादरम्यान तीन एकदिवसीय सामन्याची मालिका होणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने ढाकामधील मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला नॅशनल क्रिकेट स्टेडियम (एसबीएनसीएस) मध्ये होणार आहे. तीसरा वनडे सामना चटगांवमधील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होणार आहे.
भारताविरोधात मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशचा संघ :
तमीम इकबाल (कर्णधार), लिटन दास, अनामुल हक बिजॉय, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, यासिर अली चौधरी, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, हसन महमूद, इबादत हुसैन, नसुम अहमद, महमूद उल्लाह, नजमुल हुसैन शान्तो आणि काजी नूरुल हसन सोहन.
बांगलादेशविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत रवींद्र जाडेजा भारतीय संघाचा भाग असणार नाही. दुखापतीमुळे त्याला टीम इंडियातून वगळावे लागले आहे. याशिवाय यश दयाल देखील दुखापतीमुळे भारतीय संघाचा भाग असणार नाही. यांच्या जागी कुलदीप सेन आणि शाहबाज अहमद यांना संघात स्थान दिलं आहे. वन डे संघाचा रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे या संघात शिखर धवनला संधी दिल्याने पुन्हा एकदा रोहित-शिखर जोडी मैदानात दिसणार आहे.
बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मो. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन
भारत आणि बांग्लादेश एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 4 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
दुसरा एकदिवसीय सामना | 7 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
तिसरा एकदिवसीय सामना | 10 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |