Rohit Sharma Stats: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताची फलंदाजांनी निराश केलेय. अवघ्या 71 धावांत भारताचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले. भारताचे सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल स्वस्तात तंबूत परतले. कर्णधार रोहित शर्मा याला आपल्या लौकिकस साजेशी कामगिरी करता आली नाही.  ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने भारताच्या कर्णधाराला बाद केले. रोहित शर्मा 15 धावा काढून बाद झाला. मोक्याच्या सामन्यात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची आपेक्षा होती. पण रोहित शर्मा स्वस्तात तंबूत परतलाय. 
 
विदेशात रोहित शर्माची आकडेवारी कशी ?


रोहित शर्मा 50 वा कसोटी सामना खेळत आहे. रोहितने भारतीय मैदानावर 24 कसोटी सामने खेळले आहेत. तर विदेशी खेळपट्टीवर रोहितने 26 सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलेय. रोहित शर्माने 26 कसोटी सामन्यात 31.30 च्या सरासरीने आणि 46.12 च्या स्ट्राईक रेटने 1377 धावा केल्या आहेत. विदेशात रोहित शर्माने तीन शतके झळकावली आहेत. 127 सर्वोच्च धावसंख्या आहे. 


रोहित शर्माचे कसोटी करिअर


रोहित शर्माने 50 कसोटी सामन्यात 45.66 च्या सरासरीने आणि 55 च्या स्ट्राईक रेटने 3379 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. 212 सर्वोच्च धावसंख्या आहे.  


 














भारताची फलंदाजी ढेपाळली - 


ऑस्ट्रेलियाने पहिल्याडावात 469 धावांचा डोंगर उभारला.. दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज याने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचे काम केले. पण भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना चांगली सुरुवात देता आली नाही. त्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीही स्वस्तात तंबूत परतले. झटपट 4 विकेट गमावल्यामुळे टीम इंडिया अडचीत सापडली आहे. 


रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी फक्त तीस धावांची सलामी दिली. रोहित शर्मा 15 धावांवर कमिन्सच्या चेंडूवर बाद झाला. तर शुभमन गिल याला 13 धावांवर बोलँड याने तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारा 14 धावांवर बाद झाला. कॅमरुन ग्रीन याने पुजाराचा अडथळा दूर केला. विराट कोहलीला स्टार्कने बाद केले. विराट कोहली 14 धावांवर बाद झालाय.