Mohammed Siraj vs Steve Smith : ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी तिसऱ्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ याने आपले शतक पूर्ण केले. सिराजच्या चेंडूवर लागोपाठ दोन चौकार लगावत स्मिथने शतकाला गवसणी घातली. त्यानंतर स्मिथ आणि सिराजमध्ये बाचाबाची झाली. सिराज धावत येऊन चेंडू टाकत असताना स्मिथ यष्टीसोडून बाजूला झाला.. त्यामुळे सिराजला राग अनावार आला.. त्याने चेंडू विकेटकिपरकडे फेकत आपला राग व्यक्त केला. सिराज आणि स्मिथ यांच्यात बाचाबाचीही झाली. चेंडू टाकताना स्मिथ बाजूला झाला... ही बाब सिराज याला पटली नाही, त्यामुळेच नाराजी व्यक्त केली. आयसीसीने सिराज आणि स्मिथ यांच्यात झालेल्या प्रसंगाचा व्हिडीओ पोस्ट केलाय.
पाहा व्हिडीओ
स्मिथचे शानदार शतक
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव स्मिथ याने चिवट फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा घामटा काढला. संयमी फलंदाजी करत स्मिथ याने शतकी खेळी केली. स्मिथने पहिल्या दिवसी 95 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर आक्रमक रुप घेत शतकाला गवसणी घातली. स्मिथ याने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार लगावले. लॉर्ड शार्दूल ठाकूर याने स्मिथ याला बाद करत भारताला मोठं यश मिळवून दिले. पण त्यापूर्वी स्मिथने आपले काम पूर्ण केले. स्टिव्ह स्मिथ याने भारताविरोधात नववे शतक झळकावत नव्या विक्रमाला गवसणी घातली. भारताविरोधात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजात तो जो रुटसोबत पहिल्या क्रमांकावर पोहचलाय. भारताविरोधात जो रुट आणि स्मिथ यांनी प्रत्येकी नऊ नऊ शतके झळकावली आहेत. रिकी पाँटिंग, गॅरी सोबर्स आणि विव रिचर्ड्स यांनी भारताविरोधात प्रत्येकी आठ आठ शतके झळकावली आहेत. स्मिथ याने शानदार शतक झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मॅथ्यू हेडन आणि शिवनारायण चंद्रपॉल यांना पछाडले.