IND vs AUS, 3rd Test Match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खराब अंपायरिंगचा मुद्दा चर्चेत आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात मेनन यांनी एक नाही, दोन नाही तर तीन चुकीचे निर्णय घेतले. इंदूर कसोटीत एकापाठोपाठ एक खराब निर्णय दिल्याबद्दल चाहत्यांनी पंच नितीन मेनन यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इंदूरमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पंच नितीन मेनन यांनी चुकीचे निर्णय दिले. मेनन यांच्या चुकीच्या निर्णयांचा सपाटा सुरुच होता. यामुळे क्रिकेट चाहते आता संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी दिलेले निर्णय हे भारतीय संघाबाबतच आहेत.


नितीन मेनन यांचे तीन चुकीचे निर्णय


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नितीन मेनन यांनी तीन चुकीचे निर्णय घेतले. त्यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माला दोनदा नाबाद घोषित केलं, त्यावेळी तो बाद झाला होता. यानंतर त्यांनी रविंद्र जडेजाला एलबीडब्ल्यू (LBW) घोषित केले, पण तो डीआरएसमुळे (DRS) वाचला. नितीन मेनन दुसऱ्या कसोटी सामन्यातही विराट कोहलीला बाद करुन वादात सापडले होते.


क्रिकेट चाहत्यांचा संताप अनावर


इंदूर कसोटीत एकापाठोपाठ एक खराब निर्णय दिल्याबद्दल चाहत्यांनी पंच नितीन मेनन यांना धारेवर धरलं आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी अंपायर नितीन मेनन यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याआधी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पंच नितीन मेनन यांनी भारताच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीला वादग्रस्तरित्या एलबीडब्ल्यू (LBW) घोषित केलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.


अंपायर नितीन मेनन सोशल मीडियावर ट्रोल


 






 






 






 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


IND vs AUS, 3rd Test : भारतीय संघावर पराभवाचं सावट, 163 धावांवर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियासमोर 76 धावाचं माफक लक्ष्य