IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानात खेळवला जात असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवले जाणार होते, ज्यातील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकला असून तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने मालिकेची स्थिती 2-1 अशी आहे. आता आजचा सामना जिंकून मालिकाविजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करु शकतो. तर ऑस्ट्रेलिया मालिका बरोबरीत सोडण्यासाठी प्रयत्नशील असेल. विशेष म्हणजे आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे आजच्या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज (Anthony Albanese) स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत.






 


आजवरच्या इतिहासाचा विचार केल्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 105 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 44 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. 


भारतीय संघात महत्त्वाचा बदल


याशिवाय भारतीय संघाच्या प्लेईंग 11 चा विचार करता भारत केवळ एका बदलासह मैदानात उतरत आहे. अनुभवी मोहम्मद शमीचा प्लेईंग 11 मध्ये पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद सिराजला विश्रांची देण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. 


भारताची प्लेईंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.







WTC Final मध्ये एन्ट्रीसाठी भारताला विजय महत्त्वाचा


आजची कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. सध्या, टीम इंडिया 60.29 च्या विजयाच्या टक्केवारीसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया 68.52 विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर असून WTC फायनलमध्ये पोहोचली आहे.







हे देखील वाचा-