Rohit Sharma Captain Team India : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 6 डिसेंबरपासून सुरू झालेला कसोटी सामना रविवारी संपला आहे. डे-नाईट कसोटी सामन्यात यजमानांनी भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. ॲडलेड कसोटीतील पराभवानंतर पुन्हा एकदा रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला मागील चार कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
कर्णधारपदाखाली संघाची कामगिरी काही खास नव्हती, यासोबत रोहितची बॅटही गेल्या 12 डावात शांत आहे. फलंदाजीची सरासरी फक्त 11.83 या 12 डावांमध्ये बॅटमधून फक्त एकच अर्धशतक ठोकले आहे. ॲडलेडमध्ये हिटमॅननेही आपली बॅटिंग पोझिशन बदलण्याचा प्रयत्न केला, पण खराब फॉर्म अजून कायम आहे. क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये रोहित वाईट टप्प्यातून जात आहे आणि भारतीय कर्णधाराची फलंदाजी पाहता त्याला आवश्यकतेपेक्षा जास्त दडपण जाणवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये धावा करण्यासाठी रोहित शर्मा संघर्ष करताना दिसत आहे. गेल्या 12 डावांमध्ये रोहितच्या बॅटमधून फक्त एकच अर्धशतक झळकले आहे. रोहितची फलंदाजीची सरासरी केवळ 11.83 आहे, तर त्याच्या बॅटमधून केवळ 142 धावा आल्या आहेत. पर्थ कसोटीला मुकल्यानंतर रोहित जेव्हा ॲडलेडला परतला तेव्हा सर्वांनाच भारतीय कर्णधाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण बॅटिंग पोझिशन बदलून रोहितने स्वत:वरच अधिक दडपण घेतल्यासारखे वाटले. पिंक बॉल कसोटीच्या पहिल्या डावात रोहितने 23 चेंडूंचा सामना केला, मात्र त्याच्या बॅटमधून केवळ 3 धावा केल्या. संघाला डावलून कर्णधार पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्या डावातही रोहित 6 धावा करून पॅव्हेलियन परतला.
रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला मागील चार कसोटी सामन्यांमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहे, मात्र आता रोहितची फलंदाजीही टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. ॲडलेडमधील पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी रोहितला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला. भारतीय कर्णधाराला त्याच्या खराब फॉर्मवर लवकरच इलाज शोधावा लागेल, कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितची कामगिरी अशीच राहिली तर संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांवर कारवाई करण्याचा दबाव असेल.
रोहित शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम
सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ॲडलेड कसोटीतील पराभव हा त्याच्या कर्णधार म्हणून कारकिर्दीतील 8वा पराभव आहे. रोहितने आतापर्यंत 22 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या प्रवासाची सुरुवात चांगली झाली होती, पण न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेपासून वाईट पर्वाची सुरुवात झाली होती. या बाबतीत रोहित शर्माने आता भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांना मागे टाकले आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 34 कसोटी सामन्यांमध्ये 4 जिंकले आणि 7 सामने गमावले.
हे ही वाचा -