IND vs AUS Semi Final Dubai Forecast : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला उपांत्य सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात लाहोरमध्ये खेळला जाईल. जर रोहित शर्मा आणि टीम दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकला तर स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे ठिकाण दुबईमध्ये निश्चित होईल.






टीम इंडियाने त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले आहेत. रोहित शर्माने प्रत्येक सामन्यात नाणेफेक गमावली आहे, पण संघाला सामना जिंकण्यात कोणतीही अडचण आली नाही. पण, ऑस्ट्रेलिया एक तगडा संघ आहे आणि तो भारताला कडवी झुंज देईल. दुबईतील हवामान उष्ण असले तरी, मंगळवारी हवामानाचा मूड बदलेल. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.






भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये दुबईमध्ये कसे असेल हवामान?


हवामान अहवालानुसार, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. मंगळवारी पावसाची शक्यता 10 टक्के आहे. ताशी 27 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.  


दुबई स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल 


दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी संथ असेल. येथे फलंदाजी करणे खूपच आव्हानात्मक असेल, जसे मागील सामन्यांमध्येही दिसून आले होते. जो संघ मधल्या फळीत चांगली फलंदाजी करतो, त्याला जिंकण्याची शक्यता जास्त असते. दुबईमध्ये वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळेल.


दुबईमध्ये पावसाची शक्यता असल्याने नाणेफेक खूप महत्त्वाची ठरेल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने गेल्या तीनपैकी 2 सामने जिंकले आहेत. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकले. ऑस्ट्रेलियाने पावसामुळे 3 पैकी 2 सामने गमावले, तर एका सामन्यात त्यांनी इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला.


हे ही वाचा -


Dinesh Lad on Shama Mohamed : जाड्या, स्थूल, काँग्रेस प्रवक्त्याकडून टीका, रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांचं जशास तसं उत्तर!


Ind vs Aus Semi-Final Champions Trophy : देव न करो पण... भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामना रद्द झाला तर कोण खेळणार फायनल? काय सांगतो ICCचा नियम