Shama Mohamed tweet on Rohit Sharma : भारतीय कर्णधार रोहित शर्मावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांना सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या स्वतःच्या पक्षानेही त्यांना फटकारले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनीही वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध केला आहे.
रविवारी, शमा हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर रोहित शर्माला जाड्या म्हटले होते. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. आणि तो आतापर्यंतचा सर्वात छाप न सोडणारा भारताचा कप्तान आहे असेही म्हटले आहे. यावरून आता राजकारण रंगू लागले आहे. शमा मोहम्मद यांनी त्यांचे ट्वीट डिलीट केले. या सगळ्या राड्यावर रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांनी एबीपीशी खास बातचीत करताना प्रतिक्रिया दिली.
रोहित शर्मा टीम आणि देशासाठी खेळतो....
रोहित शर्माचे कोच दिनेश लाड म्हणाले की, खूप चुकीच ट्वीट केले आहे. त्यांनी रोहित बद्दल बोलले आहे की, तो जाडा झाला आहे आणि कर्णधार म्हणून तो चांगला नाही.यामुळे देशाचे नाव खराब झालं आहे. पण आपण रोहित शर्मा पाहिले आहे तो नेहमी चांगलं काम करत आला आहे. रोहित शर्माने ठरवील तर प्रत्येक सामन्यात 100 करेल, पण तो टीमसाठी आणि देशासाठी खेळतो.
रोहितबद्दल बोलले ते चुकीच
दिनेश लाड पुढे म्हणाले की, रोहितबद्दल बोलले ते चुकीच आहे. मी लहानपणापासून रोहितला पाहिले आहे. त्याने स्वतः च्या कर्तृत्वाने सामने जिंकून दिले आहेत. याच्या नेतृत्वाखाली 93% सामने जिंकलो आहे. तो वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे आणि या गोष्टी त्याच्याबद्दल बोलणे चुकीच आहे. देशाच्या राजकारण्याने बोलणे म्हणजे देशाचं नाव खराब झाले आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या असल्यामुळे ती टीका चर्चेत
काँग्रेसच्या प्रवक्त्या असताना तुम्ही सुरुवातीच ट्वीट केले आहे. त्यावरुन आता राजकारण सुरू झाल आहे. याआधीही रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर बोललं गेलंय. पण आता बीसीसीआयने यावर विश्वास ठेवला आहे. बरेच लोक खेळाडूंवर टीका करतात. पण आता ज्यांनी टीका केली, त्या काँग्रेसच्या प्रवक्त्या असल्यामुळे ती टीका चर्चेत आली. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने चालू आहेत. त्यामुळे अशी वक्तव्ये करणे योग्य नाही, असे दिनेश लाड म्हणाले.
व्हिडीओ पाहा -
हे ही वाचा -