सिडनी : भारतानं ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या वनडेत 9 विकेटनं विजय मिळवला. या वनडेमध्ये रोहित शर्मानं शतक झळकावलं तर विराट कोहलीनं अर्धशतक केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नाबाद 168 धावांच्या भागिदारीनं भारतानं हा दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा 121 धावा आणि विराट कोहली 74 धावा करुन नाबाद राहिला. विराट आणि रोहितच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं 237 धावांचा पाठलाग 69 बॉल शिल्लक असताना केला. या दरम्यान दोघांनी मिळून अनेक रेकॉर्ड मोडले.
Rohit Sharma Virat Kohli : रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं 7 रेकॉर्ड मोडले
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतक : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतकं केली आहे. रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध नववं शतक केलं आहे. तर विराट कोहलीच्या नावावर 8 शतकांची नोंद असून तो दुसऱ्या स्थानावर आहे.
सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतकं : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्मानं 45 शतकं केली आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर देखील 45 शतकांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवर म्हणून सर्वाधिक शतकांची नोंद डेविड वॉर्नरच्या नावावर असून त्यानं 49 शतकं केली आहेत.
रोहित कोहली भागीदारी : विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी एकदिवसीय सामन्यात 19 वेळा 100 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. 100 हून अधिक धावाची भागीदारी करण्याच्या बाबत रोहित शर्मा आता तिलकरत्ने दिलशान- कुमार संगकारा (20), सचिन तेंडुलकर- सौरव गांगुली यांनी 26 वेळ शतकी भागीदारी केली आहे.
धावांचा पाठलाग करताना 50 पेक्षा अधिक स्कोअर : विराट कोहली वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना 50 पेक्षा अधिक धावा करणारा सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीनं 70 वेळा अशी खेळी केली आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता त्यानं 69 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा : विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीनं 74 धावांची खेळी करत कुमार संगकारा याला मागं टाकलं आहे. कुमार संगकाराच्या नावावर 14234 धावा तर 14255 धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर 18426 धावांची नोंद आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं : रोहित शर्माच्या नावावर कसोटी, वनडे आणि टी 20 मिळून 50 शतकांची नोंद आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 तर विराट कोहलीच्या नावावर 82 शतकांची नोंद आहे.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक मॅच खेळण्याचं रेकॉर्ड : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅच खेळण्याच्या बाबत रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. विराट आणि रोहित शर्मानं एकत्र 391 वी आंतरराष्ट्रीय मॅच खेळली आहे.