IND vs AUS, ODI Series 2023 : आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाविरोधात दोन हात करणार आहे.  22 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका होणार आहे. मायदेशात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेय. आशिया चषकात पाठदुखीमुळे अय्यरला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या मालिकेत अय्यरच्या फिटनेसकडे लक्ष असेल. 


ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका संपल्यानंतर लगेचच विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरूवात होणमर आहे.  अशा परिस्थितीत अय्यरच्या फिटनेसची चाचणी घेण्यासाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. इनसाइड स्पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,   अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो खेळताना दिसू शकतो.  



अय्यरच्या फिटनेसबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानेही माहिती दिल होती. तो म्हणाला होता की, श्रेयस अय्यर तंदुरुस्त झालाय. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. अय्यर आता त्याच्या पाठीच्या दुखण्यापासून पूर्णपणे बरा झाला आहे, परंतु आता ते संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे की ते त्याला प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट करायचे की नाही. मालिका सुरू होण्यापूर्वी अय्यरची तंदुरुस्ती चाचणी होईल. त्यानंतर  तो तंदुरुस्त घोषित झाला तर तो पहिल्या वनडेत खेळताना दिसू शकतो.


रोहित काय म्हणाला होता ?


आशिया चषकानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तो म्हणाला की, अय्यरच्या फिटनेसबाबत कोणतीही चिंता नाही, तो 99 टक्के पूर्णपणे फिट आहे.  त्याने नेटमध्ये बराच वेळ फलंदाजीचा सराव केला आणि नंतर क्षेत्ररक्षणाचा सराव केला.  



भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक -


आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे.  पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २४ आणि २७ सप्टेंबर रोजी इंदौ आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे. 


पहिल्या दोन वनडेसाठी टीम इंडिया - 


केएल राहुल (कर्णधार, विकेकटकीपर), रविंद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दूल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा