IND vs AUS, LIVE Score : हेड-मार्श जोडीची शतकी भागिदारी, ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 विकेट्सनी विजय
India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमच्या क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 19 Mar 2023 05:31 PM

पार्श्वभूमी
IND vs AUS, Live : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अप्रतिम गोलंदाजी केली. सिराज आणि शामी यांच्या धारधार गोलंदाजीपुढे कांगारुंनी लोटांगण घातले. ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 188 धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर...More
IND vs AUS, Live : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अप्रतिम गोलंदाजी केली. सिराज आणि शामी यांच्या धारधार गोलंदाजीपुढे कांगारुंनी लोटांगण घातले. ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 188 धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर 189 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज फेल होताना दिसत होते. पण तेव्हाच केएल राहुलचे अर्धशतक आणि रविंद्र जाडेजाची संयमी खेळी याच्या बळावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. ज्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज (19 मार्च) एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. आता आजचा सामना जिंकून भारत ऑस्ट्रेलियाविकरुद्ध एकदिवसीय मालिकाविजय मिळवू शकतो. याआधी भारतानं कसोटी मालिकेत कांगारुंना 2-1 ने मात दिली असून आता एकदिवसीय मालिका विजयासाठीही भारत सज्ज झाला आहे. यंदाच्या वर्षीच एकदिवसीय चषक खेळवला जाणार असल्याने दोन्ही संघासाठी ही एकदिवसीय मालिका महत्त्वाची आहे.सामना होणाऱ्या विशाखापट्टणमच्या क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. या स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 241 आहे, जी दुसऱ्या डावात 211 पर्यंत खाली घसरते. खेळपट्टी सामान्यतः फलंदाजीसाठी चांगली असली तरी स्लो गोलंदाजी करणाऱ्यांना देखील मदत करते. पण आज पावसाची शक्यता असल्याने परिस्थिती वेगळी असू शकते. वेगवान गोलंदाजांना देखील फायदा मिळू शकतो. तसंच या ठिकाणी खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांपैकी 9 संघाने पाठलाग करून जिंकले आहेत. त्यामुळे जो कोणी संघ नाणेफेक जिंकतो, त्याला कदाचित या रेकॉर्डवर टिकून राहावेसे वाटेल आणि प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार विशाखापट्टणमसह आंध्र प्रदेशच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पडत आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. विशाखापट्टणममधील सामन्यादरम्यान तापमान 26 ते 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर येथे पावसाची 80 टक्के शक्यता आहे. तिथे रात्रीही पावसाची 50 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत, सामना खेळवताना व्यत्यय येऊ शकतो. तसेच, पावसामुळे सामना रद्द करावा लागण्याचीही शक्यता आहे.कसे आहेत दोन्ही संघ?भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
IND vs AUS: 10 विकेट्सने ऑस्ट्रेलिया विजयी
भारताला 117 धावांत सर्वबाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 11 षटकांत भारताचा 10 गडी राखून पराभव केला आहे ट्रेव्हिस हेड नाबाद 51 आणि मिचेल मार्श नाबाद 66 यांनी हा विजय मिळवून दिला आहे.