नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शुभमन गिल पहिल्यांदा भारताचं नेतृत्व करणार आहे. शुभमन गिलची भारताचा वनडेमधील कर्णधार म्हणून पहिली मालिका आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे देखील संघाचा भाग आहेत.चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर दोघेही भारताकडून खेळताना पाहायला मिळतील. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यानं पहिल्या वनडेसाठी भारताचा संघ निवडला आहे. विशेष बाब म्हणजे इरफान पठाण यानं गौतम गंभीर याचा लाडका खेळाडू हर्षित राणा याला संघात स्थान दिलं आहे.
Irfan Pathan Playing XI : इरफान पठाणनं निवडला भारताचा संघ
इरफान पठाण यानं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या वनडे संदर्भात विश्लेषण केलं. यावेळी त्यानं रोहित शर्मा, शुभमन गिल यांना सलामीवीर म्हणून निवडलं. तिसऱ्या स्थानी विराट कोहली फलंदाजी करेल. इरफान पठाण यानं चौथ्या स्थानावर उपकॅप्टन श्रेयस अय्यरला स्थान दिलं आहे. तर, पाचव्या स्थानावर केएल राहुल फलंदाजी करेल.
नितीशकुमार रेड्डी याला ऑलराऊंडर म्हणून इरफाण पठाण यानं निवडलं आहे. नितीशकुमार रेड्डी आवश्यकता असल्यास वेगवान गोलंदाजी देखील करु शकतो. पर्थ वनडेत निवड झाल्यास तो पदार्पण करेल. दुसरीकडे ऑलराऊंडर म्हणून अक्षेर पटेलला देखील स्थान दिलं गेलं आहे. ऑस्ट्रेलियातील वेगवान आणि पिचवरुन बॉल उसळतो हे लक्षात घेता तीन वेगवान गोलंदाज इरफान पठाण यानं निवडले आहेत. यामध्ये अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणाला संघात स्थान त्यानं दिलं आहे. कुलदीप यादवला देखील इरफान पठाण यानं संधी दिली आहे. कुलदीप यादवनं आशिया कप स्पर्धेत 17 विकेट घेतल्या होत्या.
इरफान पठाणन यानं निवडलेला भारताचा संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा
हर्षित राणाला संधी द्यावी
इरफान पठाण यानं हर्षित राणाला संघात संधी द्यावी, असं म्हटलं आहे. मला वाटतं हर्षित राणाला संधी मिळेल, या टीमध्ये तो एकमेव गोलंदाज आहे जो बॅटिंग करु शकतो. त्याला आठव्या स्थानावर खेळवता येईल. मी त्याला तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या रुपात पाहतो. हर्षित राणा चांगली कामगिरी करु शकतो,त्याला चांगली संधी आहे, असं इरफान पठाण म्हणाला.