नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर भारतानं एकही एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळलेली नाही. आता भारताचा संघ शुभमन गिलच्या नेतृत्त्वात पहिल्यांदा वनडे संघाचं नेतृत्व करणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील 7 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत.भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका मोबाईलवर कुठं पाहायला मिळणार किंवा वेगळा अतिरिक्त खर्च न करता कशी पाहायची ते जाणून घेणार आहोत.
IND vs AUS Free Live Streaming : लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसं पाहावं?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. पर्थ (19 ऑक्टोबर), अॅडिलेड (23 ऑक्टोबर ) आणि सिडनी (25 ऑक्टोबर) येथे हे सामने होणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेप्रमाणं हे सामने सकाळी 9 वाजता सुरु होतील. वनडे मालिकेचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्टस नेटवर्कच्या चॅनेलवरुन करण्यात येईल. तर भारतीय चाहते जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाईटवरुन लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
अतिरिक्त खर्च न करता लाईव्ह स्ट्रीमिंग कसं पाहायचं?
मोबाईलचा रिचार्ज करताना काळजीपूर्वक पाहिल्यास काही पॅकव3र जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन मोफत दिलं जातं. उदा. 349 रुपयांचा 28 दिवसांचा रिचार्ज केल्यास जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन मोफतं मिळतं. यामुळं तुम्ही जिओ हॉटस्टारचा कोणताही प्लॅन खरेदी न करता भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅचेस मोफत पाहू शकता. याशिवाय पहिली वनडे मॅच दूरदर्शनवर देखील मोफत पाहू शकता.
भारताचा संघ : शुभमन गिल (कॅप्टन ), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकॅप्टन), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलियाचा संघ: मिशेल मार्श (कॅप्टन), जेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जोश हेजलवूड, ट्रॅविस हेड, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मैथ्यू रेनशॉ, मैथ्यू शॉर्ट, मिशेल स्टार्क