मुंबई : आशिया कप जिंकून तब्बल तीन आठवडे उलटले, पण अजूनही भारतीय क्रिकेट संघाला आशिया कप ट्रॉफी (Asia Cup Trophy) मिळाली नाही. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवून नवव्यांदा विजेतेपद पटकावले होते. मात्र, सामन्यानंतर आशिया क्रिकेट क्लब (ACC) आणि पीसीबीचे (PCB) चेअरमन मोहसिन नकवी (Mohsin Naqvi) यांनी ट्रॉफी स्वतःकडे घेतली आणि ती अजूनही टीम इंडियाला मिळाली नाही.
ट्रॉफी सध्या कुठे आहे? (Where is Asia Trophy)
क्रिकबजच्या (Cricbuzz Report) अहवालानुसार, आशिया कप ट्रॉफी सध्या दुबईतील आशिया क्रिकेट क्लबच्या ऑफिसमध्ये ठेवलेली आहे. पण ती टीम इंडियाला केव्हा मिळणार याबाबत अद्याप काही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.
पुढील बैठकीत निर्णय (Next ACC Meeting)
30 सप्टेंबरला दुबईत झालेल्या एसीसी बैठकीत ठरवण्यात आलं की, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या पाच देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये ट्रॉफी विवादावर चर्चा होईल. ही बैठक पुढील महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे, त्याच काळात आयसीसीची (ICC) बैठकही होणार आहे.
मोहसिन नकवी बैठकीला आले नाही तर? (ICC Meeting)
जर मोहसिन नकवी या बैठकीत हजर राहिले नाहीत, तर विवाद आणखी तीव्र होऊ शकतो. याआधी त्यांनी जुलै महिन्यात झालेल्या आयसीसी वार्षिक परिषदेतही (ICC Annual Conference) सहभाग घेतला नव्हता.
बीसीसीआयची पुढील भूमिका (BCCI’s Next Move)
बीसीसीआयच्या (BCCI Official) सूत्रांनुसार, सध्या बोर्ड पुढील निर्णयाचा विचार करत आहे. काही दिवसांपूर्वी नकवी यांनी आदेश दिला होता की त्यांच्या परवानगीशिवाय ट्रॉफी भारताला दिली जाणार नाही. त्यावर आता चर्चा केली जात आहे.
Asia Cup Trophy Controversy : नेमकं काय घडलं होतं?
आशिया कपमध्ये यंदा भारत आणि पाकिस्तान या दोन संघात अंतिम लढत झाली. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव केला आणि आशिया कपवर नाव कोरलं. मात्र, त्यानंतर काही नाट्यमय घडामोडी घडल्या.
भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मोहसिन नकवीच्या हस्ते आशिया कप स्वीकारण्यास नकार दिला. त्याचवेळी मोहसिन नकवी देखील तो चषक घेऊन पळून गेला. त्यामुळे यंदाची मालिका मात्र चांगलीच चर्चेत आली.
ही बातमी वाचा: