ICC Cricket World Cup 2023: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) अंतिम सामना (ICC World Cup FInal 2023) आता लवकरच सुरू होणार आहे. टीम इंडियानं 2011 मध्ये शेवटचा विश्वचषक जिंकला होता आणि त्यावेळी महेंद्रसिंह धोनी संघाचा कर्णधार होता, पण रोहित शर्मा त्या संघात खेळला नव्हता. दरम्यान, रोहित शर्मानं 2007 टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आणि तो जिंकलाही. अशा परिस्थितीत रोहितनं फायनलसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये धोनीच्या कर्णधारपदाची धुरा पाहिली आहे, तसेच पाकिस्तानसारख्या तगड्या विरोधी संघावरही विजय मिळवला आहे.
रोहितला धोनीची आली आठवण
अशा परिस्थितीत विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला की, 2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये तुम्ही धोनीसोबत होता, धोनीनं त्याला काही खास संदेश दिलाच असेल. तुम्ही काही खास गोष्टींबद्दल बोलला असाल, मग त्या अनुभवांच्या मदतीनं तुला आजच्या अंतिम सामन्यापूर्वी टीमला काही मेसेज द्यायचा आहे का?
रोहित या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाला की, "नाही...कोणताच खास मेसेज देण्याची गरज नाही. फायनल मॅचपूर्वी कोणतंच स्पीच देण्याचा नियम नाही आणि त्याची गरजही नाही. आम्ही या सामन्यासाठी काहीच बदल करणार नाही. मला असं नाही वाटत की, एम एसनं त्या सामन्यापूर्वी कोणताही खास मेसेज किंवा स्पीच दिला होता."
2007 वर्ल्डकपप्रमाणेच खेळणार रोहितसेना
2007 वर्ल्डकप फायनलच्या आठवणींना उजाळा देत रोहित शर्मानं म्हटलं की, "आम्ही त्या टुर्नामेंटमध्ये जशी सुरुवात केलेली, तसाचा त्या टुर्नामेंटची फायनल मॅच खेळली होती. तसंच, आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये दसं खेळत आलोय, तसंच आम्ही खेळणार आहोत. हा, एक गोष्ट मात्र नक्की, मॅचच्या दिवशी, मॅचबाबत नॉर्मल चर्चा होतात. काय करायचंय, कसं करायचंय? बस. बाकी टीममधील सर्वांना त्यांचा रोल माहिती आहे, त्यामुळे कोणत्याही मेसेजची गरज नाही."
20 वर्षांनी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात निर्णायक लढत
योगायोगाची बाब म्हणजे विश्वचषकाच्या महायुद्धात यंदा तब्बल वीस वर्षांनी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघांत पुन्हा निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर वीस वर्षांनी दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने उभे ठाकले आहेत. त्यामुळं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा रोहित शर्माचा भारतीय संघ वचपा काढणार का, याकडे भारतीय क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
यांच्या हातात बॅट नाही जणू तलवारच असते, गोलंदाजांवर तुटून पडतात; टीम इंडियाचे धडाकेबाज फलंदाज!